आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात जगवणारा 'पुराना प्यार'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

डॉ. मोहन आगाशे, लिलीट दुबे यांचा अप्रतिम अभिनय, पुराना प्यारची कथा, संवाद, लोकेशन्स, पार्श्वसंगीत या सर्व गोष्टींनी या शॉर्टफिल्ममध्ये रंग भरले आहेत. 

पुणे - 'गोरीला शॉर्टस्' या युट्युब चॅनलद्वारे 'लव हॅंडल्स' या वेबसिरीजमधून 'प्रेम' या विषयावरील वेगवेगळ्या पाच कथा दिग्दर्शक अंबर चक्रवर्ती यांनी प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. यातील पाचवा भाग 'पुराना प्यार' (#PuranaPyaar) हा नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे व लिलीट दुबे यांच्या मुख्य भूमिका आहेत. पुराना प्यारचे वैशिष्ट्य म्हणजे यात प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी 'ले फिर उड चला' हे गाणे गायले आहे.

आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात वृद्धत्वाकडे झुकताना आपल्याला कोणीतरी समजून घेणारे, प्रेम करणारे, आपल्यासोबत फिरणारे कोणीतरी असावे अशा भावना अनेकांच्या मनात असते. हीच भावना दिग्दर्शकाने पुराना प्यारमधून मांडली आहे. या वेबसिरीजमध्ये सर्वच गोष्टी अगदीच जमून आल्या आहेत. डॉ. मोहन आगाशे, लिलीट दुबे यांचा अप्रतिम अभिनय, पुराना प्यारची कथा, संवाद, लोकेशन्स, पार्श्वसंगीत या सर्व गोष्टींनी या शॉर्टफिल्ममध्ये रंग भरले आहेत. 

पुराना प्यारमधील 'ले फिर उड चला' हे पूर्ण गाणे प्रेक्षकांसाठी नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. लव हॅंडल्स या सिरीजमध्ये 'अश्लिल प्यार', 'चोरी चोरी प्यार', 'सायलेंट प्यार', 'गुड गुड वाला प्यार' व 'पुराना प्यार' अशा पाच कथा आहेत. या सर्व कथांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: web series purana pyaar talks on old age couple love story