'वीरप्पन' वरील वेबसीरीजवर बंदी ; न्यायालयाचा निर्णय

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 13 January 2021

बंगळुरु सत्र न्यायालयानं आणि दिवाणी न्यायालयानं त्या मालिकेच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. तसा आदेशही दिला आहे.

मुंबई - चंदनतस्कर वीरप्पन याचे नाव कुणाला माहिती नाही असे म्हटल्यावर खरे वाटणार नाही. कोणेएकेकाळी आपल्या क्रौर्यानं दहशत तयार करणा-या वीरप्पननं सरकारला नाकीनऊ आणले होते. त्यानं दक्षिणेतल्या काही सेलिब्रेटींचे अपहरण केले होते. त्यामुळे तो आणखीनच प्रसिध्द झाला होता. त्याच्याविषयी अनेक दंतकथाही तयार झाल्या होत्या. अशा कुख्यात वीरप्पनवर तयार करण्यात आलेल्या मालिकेच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.

बंगळुरु सत्र न्यायालयानं आणि दिवाणी न्यायालयानं त्या मालिकेच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. तसा आदेशही दिला आहे. वीरप्पन याच्या आयुष्यावर आधारित अशा 'वीरप्पन: हंगर फॉर किलिंग' मालिकेत दाखविण्यात आलेल्या काही प्रसंगावर त्याची पत्नी मुथुलक्ष्मी हिनं आक्षेप घेतले आहेत. तिनं याविषयी न्यायालयात याचिका दाखल केली होती. अशाप्रकारची मालिका तयार करुन वीरप्पन यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मुथुलक्ष्मी यांनी सांगितले.

Veerappan (2016 film) - Wikipedia

याशिवाय निर्माते आणि दिग्दर्शक यांनी कथेची मोडतोड करुन तिला वेगळ्या पध्दतीने मांडण्यात आले आहे. त्यामुळे वीरप्पन यांच्याविषयी चूकीच्या गोष्टी समाजात पसरण्याचा धोका असल्याचे वीरप्पन यांच्या पत्नीनं म्हटलं आहे. यापूर्वीही काही निर्माते आणि दिग्दर्शक यांनी वीरप्पनवर चित्रपट बनवले. आणि त्यातून लाखो रुपये कमावले. मात्र त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. मुथुलक्ष्मीच्या वकिलांचे असे म्हणणे आहे की, या चित्रपटाचे प्रदर्शन म्हणजे घटनेतील परिच्छेद 21 चे उल्लंघन केल्यासारखे आहे.

Veerappan malayalam full movie | വീരപ്പൻ | full hd 1080 | malayalam action  movie | upload 2016 - YouTube

न्यायालयात जे निवेदन सादर करण्यात आले आहे त्यात मुथुलक्ष्मी अशा म्हणाल्या की, माझ्या पतीला जाऊन 16 वर्षे झाली. शेवटी मी ज्यावेळी चैन्नई दिवाणी न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय मध्ये दाद मागावी लागली. त्यावेळी न्यायालयानं माझ्या अधिकारांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली होती. आणि निर्मात्यांना मला 25 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. आता पुन्हा एक वेगळे निर्माते वीरप्पन यांची प्रतिमा मलिन करणारी मालिका तयार करत आहेत त्यामुळे आम्हाला मोठया अपमानाला सामोरं जावं लागत आहे. 

परिणीती चोप्राच्या ‘द गर्ल ऑन ट्रेन’ च्या टीझरचा धुमाकुळ

सध्या कोर्टाच्या आदेशानंतर 'वीरप्पन: हंगर फॉर किलिंग' ही मालिका युट्युब आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन हटविण्यात आली आहे. त्यामुळे ती प्रदर्शित न करण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोर्टाची पुढील सुनावणी होईपर्यत ही मालिका प्रदर्शित होणार नाही. या मालिकेवरुन राजकारणाला सुरुवात झाली आहे. मुथुलक्ष्मी यांनी उचलेल्या मुद्दयांना तामिळनाडू मध्ये होणा-या विधानसभा निवडणूकीशी जोडले जात आहे. 

 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: web series on veerappan hold by karnataka court wife slams false stories