'असूर'प्रेमींनो दुसरा सीझन येतोय, पोस्ट व्हायरल

प्रसिध्द अभिनेता अर्शद वारसीचं डिजिटल डेब्यु या मालिकेच्या माध्यमातून झालं होतं.
Asur web serise
Asur web serise Team esakal

मुंबई - मनोरंजन क्षेत्रात निवडक अशा वेबसिरिज आहेत (indian entertainment serise) ज्यांची लोकप्रियता प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. त्यात असूरचेही नाव घ्यावे लागेल. वायकॉम 18(vicom18) च्या वतीनं आता लोकप्रिय मालिका असूरचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याविषयीची माहिती सुत्रांनी दिली आहे. या प्रॉडक्शनच्या वतीने येत्या काळामध्ये मनोरंजनाची आगळी वेगळी पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. अभिनेता ऋतिक रोशनचा फायटर नावाचा सिनेमाही आगामी काळात प्रसिध्द होणार आहे. (web serise asur 2 shooting started arshad warsi sharib hashmi)

ज्या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले ती असूर (asur season 2) नावाची मालिकेच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. असूर मालिकेच्या दुस-या सीझनची चर्चा सोशल मीडियावर (social media) रंगण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यात महत्वाची भूमिका साकारणारा शारिब हाशमीच्या नावाचीही चर्चा होताना दिसत आहे. या मालिकेच्या पहिल्या सीझन मध्ये त्यानं केलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.

Asur web serise
अंडरटेकर सिरियस झाला, बॉलीवूडच्या खिलाडीची तंतरली...

गौरव शुक्ला, विनय छावल आणि निरेन भट्ट लिखित या मालिकेचा पहिला सीझन ओनी सेन यांनी दिग्दर्शित केला होता. प्रसिध्द अभिनेता अर्शद वारसीचं डिजिटल डेब्यु या मालिकेच्या माध्यमातून झालं होतं. त्याचा पहिला सीझन प्रचंड लोकप्रिय झाला होता. असूरचा दुसरा सीझन यावर्षी दिवाळीच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com