असा असतो लाडक्या श्रेयस तळपदेचा सुट्टीचा दिवस

श्रेयस तळपदे 
Friday, 17 April 2020

वीकएण्डचा असा काही माझा प्लॅन नसतो. तरीही रविवारी सुट्टी असली किंवा चित्रीकरण नसल्यास मी खूप रिलॅक्स असतो. कारण आपल्याकडे रविवार म्हटल्यावर सगळ्यांच्या मनात आनंद असतो. तसा आनंद माझ्या मनातही असतो. 

चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या मंडळींना वीकएण्ड असतो, असे मला वाटत नाही. शूटींग नसताना काही दिवस घरी थांबावे लागते, तोच आमचा वीकएण्ड. त्यामुळे वीकएण्डचा असा काही माझा प्लॅन नसतो. तरीही रविवारी सुट्टी असली किंवा चित्रीकरण नसल्यास मी खूप रिलॅक्स असतो. कारण आपल्याकडे रविवार म्हटल्यावर सगळ्यांच्या मनात आनंद असतो. तसा आनंद माझ्या मनातही असतो. मग रविवारी काहीसे उशिरा उठणे, जीम वगैरे उशिरा करणे, वाचन करणे, दुपारी जेवण झाल्यानंतर थोडा वेळ झोपणे, संध्याकाळी एखादी फिल्म पाहणे असा माझा दिनक्रम असतो.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रविवारी बाहेर जायला मला कंटाळा येतो. रविवार मी तसा एन्जॉय करतो. मला रविवारचा दिवस खूप आवडतो. रविवारची सुट्टी ही काहीशी वेगळीच असते. त्या दिवशी पूर्ण दिवस मी घरीच थांबतो. शनिवारी कुटुंबासोबत चित्रपट पाहायला किंवा डिनरला जातो. शनिवारी कधी मित्रांना भेटणे, त्यांच्याशी गप्पा मारणे असते.

एखादा मित्र आणि त्याची फॅमिली रविवारी दुपारी आमच्या घरी जेवायला येतात. मात्र, संध्याकाळी मी कुटुंबीयासोबतच असतो. आता लॉकडाउन आहे आणि तो संपल्यानंतर काम आणि काम सुरू होणार आहे. त्यामुळे रविवारीदेखील काम करावे लागणार आहे. सध्या शिल्लक असलेली आणि रखडलेली कामे संपवावी लागणार आहेत. त्यामुळे संडेची सुट्टी काही दिवस तरी मिस करणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: weekend holiday of marathi actor shreyas talapade