सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचं छोट्या पडद्यावर कमबॅक

सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचं छोट्या पडद्यावर कमबॅक

मुंबई: मोठ्या तसेच छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारणारी अभिनेत्री वर्षा उसगावकर आता छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत ती कोल्हापुरातील घरंदाज सासूची भूमिका साकारत आहे.
वर्षा उसगावकरने मराठी चित्रपटांबरोबरच हंदी चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपल्याअभिनयाची चुणूक दाखविली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील पहिली ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.

जवळपास दहा वर्षांपूर्वी स्टार प्रवाहवरील मन उधाण वाऱ्याचं या मालिकेत तिने काम केले होते आणि आता पुन्हा स्टार प्रवाहचीच मालिका ती करीत आहे.  ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत ती नंदिनी नावाची व्यक्तिरेखा साकारीत आहे. या मालिकेतला त्यांचा घरंदाज सासूचा अंदाज नक्कीच वेगळा ठरणार आहे.

वर्षा यांनी आपल्या कमबॅकवर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सची मालिका करताना आनंद होतोय. मालिकेमुळे आपण घराघरात पोहोचतो. प्रेक्षकांच्या जगण्याचा भाग होतो. त्यामुळेच मालिका करताना मला नेहमीच आनंद होतो. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतली ही भूमिका नक्कीच वेगळी आहे. नंदिनी गृहोद्योग समुहाची ती प्रमुख आहे. यासोबतच कोल्हापुरातल्या शिर्के पाटील या नामांकित कुटुंबाचं ती प्रतिनिधित्व करते. नंदिनी हे पात्र प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे. 

(संपादनः पूजा विचारे)

Well known actress Varsha Usgavkar's comeback tv serial

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com