रणवीर सिंगला शाळेत मित्र काय चिडवायचे? दिग्दर्शक मोहित सुरीनं सांगितल्या बालपणाच्या आठवणी

ranveer
ranveer

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत मस्तमौला कलाकार रणवीर सिंह आहे. शाळेत असल्यापासूनच तो असा अतरंगी आहे. काही तरी वेगळी अतरंगी स्टाईल करण्याची त्याची पद्धत जुनी आहे. आम्ही त्याला रेन्बो असे म्हणायचो. तो आता मोठा स्टार असला आणि हेअरकट व कपडे अतरंगी घालत असला तरी तेव्हापासूनच तो असा आहे, असे निर्माता व दिग्दर्शक मोहित सुरी यांनी सांगितले.

मोहित सुरी यांचा मलंग हा चित्रपट यावर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. या वेळी त्याची भेट घेतली असता त्यांनी ही माहिती दिली. मलंगचा अर्थ मस्तमौला. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत मस्तमौला अभिनेता कोण आहे असे त्यांना विचारले असता त्यांनी रणवीर सिंगचे नाव घेतले. आज अभिनेता ऱणवीर सिंगचा वाढदिवस आहे. त्यामुळे या गोष्टीला पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न केला. रणवीर सिंग आणि मोहित सुरी दिल्लीतील एकाच शाळेत शिकत होते. मोहित रणवीरला काहीसे सीनियर होते. ते म्हणाले, की सगळ्यांना आता रणवीर स्टार झाला आहे म्हणून अशी अतरंगी हेअर स्टाईल किंवा कपडे घालीत असेल. तसेच आपल्याच धुंदीत असल्यासारखे वाटत असेल. पण तसे काहीही नाही.

शाळेत असल्यापासून मी त्याला चांगलाच ओळखत आहे. तो पूर्वीपासूनच असा अतरंगी आहे. शाळेत असताना वेगळी स्टाईलची हेअरस्टाईल करायचा. तेव्हा शिक्षकांकडून कित्येक वेळा त्याला बोलणी खावी लागली आहेत. पण तेव्हा आणि आताही तो काही बदललेला नाही. त्याचा स्वभाव आहे तसाच आहे. त्याने आणि मी शाळेत असताना एका नाटकात काम केले होते आणि तेव्हाच मला वाटले होते की ये बंदे मे कुछ तो दम है... आणि आता तो स्टार झाला आहे. रणवीर आता खूप मोठा झाला आहे. माझा शाळेपासूनचा तो मित्र आहे आणि त्याच्याबरोबर आतापर्यंत काम मी केलेले नाही पण एकदा तरी काम करणार हे निश्चित.

What did Ranveer Singh want to tease his friend at school Childhood memories told by director Mohit Suri

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com