निक आणि पीसीचं चाललंय काय?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

सध्या प्रियांका अमेरिकन गायक निक जोनासच्या नात्यामुळे प्रकाशझोतात आली आहे.

देसी गर्ल प्रियांका चोप्राचं नाव आतापर्यंत अनेक बॉलीवूड कलाकारांशी जोडलं गेलं. प्रियांकाचं खासगी आयुष्य बी-टाऊनमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतं. सध्या प्रियांका अमेरिकन गायक निक जोनासच्या नात्यामुळे प्रकाशझोतात आली आहे.

priyanka chopra and nick jonas

प्रियांकाने नुकतीच निकच्या कौटुंबिक कार्यक्रमात हजेरी लावली होती. प्रियांका आणि निकचे एकत्रित फोटो सध्या व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये प्रियांका गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसतेय, तर निकही अगदी उमदा दिसतोय. याआधीही प्रियांका आणि निकला एकत्र पाहण्यात आलं होतं. प्रियांका चोप्रा आणि  निकचे हे सतत व्हायरल होणारे फोटो पाहून या दोघांमध्ये नक्की शिजतंय तरी काय, असा प्रश्‍न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what is exactly in between nick and priyanka chopra