इतकं PUBG खेळता, पण त्याचा फुलफॉर्म माहितेय का??

वृत्तसंस्था
Wednesday, 21 August 2019

भारतातच नाही तर जगभरात या गेमवर सगळे तुटून पडतात. पण जे लोक हा गेम इतका मनापासून खेळतात, त्यांना या गेमचा म्हणजेच PUBG या शब्दाचा फुलफॉर्म माहितेय का? हा प्रश्न चक्क केबीसीमध्येही विचारला गेला. 

PUBG या गेमचं सगळ्यांना वेड लागलंय, वेड नाही तर व्यसनच लागलंय म्हणा ना... सर्वच वयोगटामध्ये या गेमची क्रेझ आहे. भारतातच नाही तर जगभरात या गेमवर सगळे तुटून पडतात. पण जे लोक हा गेम इतका मनापासून खेळतात, त्यांना या गेमचा म्हणजेच PUBG या शब्दाचा फुलफॉर्म माहितेय का? हा प्रश्न चक्क केबीसीमध्येही विचारला गेला. 

रिअॅलिटी शो केबीसी अर्थात ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये देखील या गेमची क्रेझ पाहायला मिळाली. त्यामुळेच या शोच्या नुकत्याच झालेल्या एका भागामध्ये सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला ‘PUBG’ या गेमचा फुलफॉर्म विचारला.

मल्टीप्लेयर गेम PUBG चा फुल फॉर्म काय आहे?” असा प्रश्न अमिताभ यांना विचारला. मात्र हा प्रश्न विचारल्यानंतर स्पर्धक थोडासा गोंधळून गेला. विशेष म्हणजे ‘पब जी’ या खेळाचं जरी लाखो लोकांना वेड लागलं असलं तरीदेखील त्याचा फुल फॉर्म फार कमी जणांना माहित आहे.PUBG in KBC

हा आहे PUBG चा फुलफॉर्म ?

PUBG या नावाने प्रसिद्ध असलेल्या या गेमचा फुल फॉर्म ‘प्लेयर्स-अननोन बॅटलग्राउंड’ (PlayerUnknown’s Battleground) असा आहे. ‘प्लेयर्स-अनक्नोन बॅटलग्राउंड’ या गेमचं अनेकांना क्रेझ लागलं असून काही दिवसापूर्वी हा गेम खेळणाऱ्या प्रोफेशनल प्लेयर्ससाठी PUBG Nations Cup ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what is the full form of multi player game pubg