
Vaalvi रिलीज झाल्यानंतर असं काय घडलं की Shivani Surve ला रात्री रडू कोसळलं
Shivani Surve News: परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' सिनेमा थिएटरमध्ये गाजला. नुकतंच वाळवीने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केले आहेत. वाळवी सिनेमाचं सगळीकडे कौतुक होतंय. सिनेमातील कलाकारांचा अभिनय सुद्धा प्रचंड गाजला.
अशातच शिवानी सुर्वेची एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. या मुलाखतीत शिवानीने तिला वाळवी रिलीज झाल्यांनतर रडू का कोसळलं याचा उलगडा केलाय.
(What happened after the release of Vaalvi Shivani Surve made cry at night)
रेडिओ सिटी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शिवानी म्हणाली.. "खूप प्रेशर होतं. समोर स्वप्नील - सुबोध होते. दोघेही अभिनयात अगदी परफेक्शिस्ट. मला त्यांच्यासारखं काम नव्हतं करायचं तर मला माझं काम चांगलं करायचं होतं.
त्याचं प्रेशर मी दोन अडीच वर्ष घेतलं.. कारण कोरोना आणि लॉकडाऊन असल्याने सिनेमाची रिलीज डेट सारखी पुढे पुढे जात होती. आमच्या वाळवीने वाळवी सारखंच काम केलंय. ती सुरुवातीला थेटरमध्ये लागली आणि हळूहळू ती पसरली.
शिवानी पुढे म्हणाली.. सिनेमा रिलीज झाल्यांनतरचे ते दोन तीन आठवडे तेव्हा माझी अस्वस्थता खूप होती.. पहिल्या आठवड्यात शो होते पण नंतर खूप शो कमी झाले. मी रोज रात्री बुक माय शो वर बघायचे Counting किती आहे ते बघायचे.
पण शो काही केल्या वाढत नव्हते. मग एके रात्री मी रडले.. खूप रडले. मग मी ठरवलं आता बुक माय शो ओपन करायचाच नाही काही झालं तरी. त्याच्यानंतर साधारण एक आठवडा लागला वाळवीने पीक अप घेतला." अशाप्रकारे शिवानीने तिला आलेला अनुभव शेयर केला.
नुकतंच झी स्टुडिओजने वाळवी च्या ५० दिवसांची पोस्ट शेयर केलीय. प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल प्रेमामुळे #Thrillcom ‘वाळवी’चे ५० दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने वाळवी प्रेक्षकांना ९९ रुपयात पाहायला मिळणार आहे.
प्रेक्षकांसाठी खास आठवडाभर हि विशेष ऑफर असणार आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना वाळवी थिएटरमध्ये पाहायचा असेल त्यांच्यासाठी हि खास पर्वणी असणार आहे. वाळवी काहीच दिवसांपूर्वी ZEE 5 या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालाय.