
Vilasrao Deshmukh Birthday: बाप म्हणजे काय? विलासरावांच्या 'या' प्रसंगाने रितेशला कळलं
Vilasrao Deshmukh Birthday News: आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा वाढदिवस. विलासराव देशमुख आज जरी आपल्यात नसले तरी त्यांनी करून ठेवलेलं काम मोठं आहे.
आजही महाराष्ट्रातील तमाम जनतेला विलासरावांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मुलगा म्हणून रितेश सुद्धा वडिलांनी दिलेले संस्कार आणि शिकवण विसरला नाही.
अगदी लहानपणापासून रितेश विलासरावांकडून कळत नकळत शिकत आलाय. अशाच एका प्रसंगाने बाप म्हणजे काय? हे रितेशला कळलं. काय होता तो प्रसंग जाणून घेऊया.
(What is a father? Riteish deshmukh came to know about Vilasrao deshmukh 'this' incident)
रितेशने एका मुलाखतीत या प्रसंगाचा उल्लेख केला. रितेशने काही वर्षांपूर्वी नॉन व्हेज खाणं पूर्ण बंद केलंय. रितेशने विगन आहार पद्धत अंगीकारली आहे. याआधी रितेशला नॉन व्हेज खायची प्रचंड आवड होती. परंतु नंतर रितेशने विगन आहार पद्धती स्वीकारली. इतकंच नव्हे रितेश - जिनिलियाने स्वतःची विगन पदार्थांची कंपनी सुद्धा उघडली आहे.
रितेश हे सर्व सांगत असताना त्याला वडिलांची आठवण झाली. विलासरावांना नॉन व्हेज प्रचंड आवडायचं. चिकन करी ही विलासरावांच्या आवडीची. चिकन जेव्हा जेव्हा घरी बनायचं तेव्हा तेव्हा चिकन लेग पीस खाण्यासाठी सर्व पुढाकार घ्यायचे.
विलासरावांना सुद्धा लेग पीस साहजिक आवडत असणार. पण जेव्हा सर्व मुलं एकत्र जेवायला बसायचे तेव्हा विलासराव स्वतःहून मुलांच्या ताटात लेग पीस द्यायचे. स्वतःआधी विलासराव मुलांचा विचार करायचे.
रितेश जेव्हा बाप झाला तेव्हा विलासरावांची ही कृती त्याला, बाप म्हणजे नेमकं काय हे शिकवून गेली. स्वतःच्या आनंदाआधी मुलांचं सुख कशात आहे, हे रितेशला तो बाप झाल्यावर कळलं.
त्यामुळे विलासरावांकडून बाप म्हणजे काय? हे रितेश कळत नकळत शिकला. विलासराव जग सोडून गेल्यानंतर रितेश कायमच वडिलांची आठवण जागवणाऱ्या पोस्ट शेयर करत असतो.