
New Parliament Building: नवीन संसद भवनाचे धार्मिक महत्व काय? अमिताभ बच्चन यांनी दाखवली उत्सुकता
New Parliament Building on Amitabh Bachchan News: आज 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नवीन संसदेचे उद्घाटन केलं.
संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरूनही राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेससह 19 विरोधी पक्षांनी नव्या संसदेच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी मात्र नवीन संसद उद्घाटनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय नवीन संसदेबद्दल ब्लॉग लिहिला आहे.
(What is the religious significance of New Parliament Building? Amitabh Bachchan showed interest )
अमिताभ बच्चन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'देशाची नवी संसद सुरू होणार आहे. माजी खासदार असल्याने मी या विशेष प्रसंगी माझ्या शुभेच्छा देतो.
मला आता या संसदेच्या गुणवत्तेबद्दल आणि आकाराबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
तसेच, मला या नवीन इमारतीचा धर्मशास्त्रीय, पौराणिक, ज्योतिषशास्त्रीय अर्थ काय आहे हे सुद्धा जाणून घ्यायचे आहे.' अशी पोस्ट अमिताभ बच्चन यांनी केलीय.
अमिताभ बच्चन रोज रात्री झोपण्यापूर्वी चाहत्यांसाठी ब्लॉग पोस्ट लिहितात. ब्लॉगच्या माध्यमातून ते अनेकदा विविध विषयांवर मुद्दा मांडतो.
कधी अमिताभ त्याच्या चित्रपटांशी संबंधित एखादा किस्सा सांगतो तर कधी सध्याच्या मुद्द्यावर आपली बाजू मांडतात.
शुक्रवारी रात्री त्यांनी नवीन संसद भवनाबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी आनंद आणि उत्सुकता व्यक्त केली.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अमिताभ बच्चन सध्या त्यांचा आगामी चित्रपट सेक्शन 84 मध्ये व्यस्त आहेत. रिभू दासगुप्ता यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
हा एक कोर्ट ड्रामा चित्रपट असेल ज्यामध्ये डायना पेंटी, अभिषेक बॅनर्जी आणि निमृत कौर दिसणार आहेत. यापूर्वी बिग बी पिंक सारख्या कोर्ट ड्रामा चित्रपटात दिसले होते जे सुपरहिट ठरले होते.