आलियाच्या तोंडून चटकन निघाला 'तो' अश्लील शब्द..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

अभिनेत्री आलिया भटच्या बोलण्याची नेहमीच नेटकरी खिल्ली उडवत असतात. तिचे असे अनेक किस्से समोर आलेत, ज्यामुळे आलिया कायम चर्चेत राहिलीये. पण, गेले अनेक दिवस आलियाचे असे अनोखे किस्से समोर आले नव्हते. मात्र, या घटनेनंतर आलियाने आता पुन्हा कमबॅक केलाय असं म्हणायला हरकत नाही. 

आलिया नुकतीच करीनासोबत एका कार्यक्रमात गेली होती. या कार्यक्रमात आलिया, करण जोहरने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत होती. बोलता, बोलता आलिया तिच्या न विचार करता विधान करण्याच्या सवयीमुळे आता पुन्हा एकदा गोत्यात आलीये. 

आलिया खरतर करीनाबद्दल बोलत होती. करीनाने अनेक सिनेमे केलेत, एकामागून एक सिनेमे केलेत. लग्न झाल्यावर तुमच्या कामाचा वेग मंदावतो. मुलं झाल्यावर तुम्ही पुन्हा इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करू शकत नाही. पण, करीनासोबत यातलं काहीच झालं नाही. करीना माझ्यासाठी आणि माझ्या मैत्रिणींसाठी प्रेरणास्थान आहे. करीनाचे फोटो आम्ही जेंव्हा पाहतो तेंव्हा करीना किती सुंदर किती हॉट आहे याचीच चर्चा असते. नुसत्या ट्रॅक पॅन्ट, चप्पल आणि टीशर्टमध्ये करीना किती सुंदर आहे, हेच आम्ही बोलत असतो.  पण, बोलता बोलता चटकन आलियाच्या तोंडून 'तो' अश्लील शब्द बाहेर पडला आणि कार्यक्रमात नुसता गोंधळ उडाला. 

आलियाच्या तोंडून बाहेर पडलेली हा अश्लील शब्द खरं तर करण जोहरनं ऐकला नाही. पण, जेव्हा करिनानं कारण जोहरला आलिया काय म्हटली हे हे सांगितलं त्यावर करणलाही हसू आवरलं नाही. मी हिच शिकवण दिली का?  असा सवाल आलियाला विचारला.

WebTitle : when aalia used that bad word in front of audience  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when aalia used that bad word in front of audience

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: