Ajay Devgn: 'ती खोटारडी आहे,' असं म्हणत सर्वांसमोर अजय देवगणनं रवीना टंडनचा केला होता अपमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajay Devgn and Raveena Tandon

Ajay Devgn: 'ती खोटारडी आहे,' असं म्हणत सर्वांसमोर अजय देवगणनं रवीना टंडनचा केला होता अपमान

९० च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री रवीना टंडनने तिच्या काळात एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. चित्रपटांसोबतच रवीना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत होती. अक्षय कुमारशिवाय रवीनाचे नाव अजय देवगणसोबतही जोडले गेले होते.

'दिलवाले' चित्रपटातील ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली, पण जेव्हा करिश्मा कपूर त्यांच्यात आली तेव्हा त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.

अजय रवीनावर अफेअरच्या बातम्यांमुळे चांगलाच संतप्त झाला आणि तिची एका मुलाखतीमध्ये चांगलीच हजेरी घेतली. एवढच नाही तर या मुलाखतीमध्ये त्यानं तिला ' ती नाटक करणारी आणि खोटारडी' असल्याचं म्हटलं होतं.

अजय आणि करिश्मा कपूर यांच्या अफेअर सुरू होतं. रवीनाचं देखील अजयवर प्रेम होतं. परंतु करिश्माचं येणं तिला अजिबात आवडलं नव्हतं. तेव्हा नाराज झालेल्या रवीनानं एका मुलाखतीमध्ये दावा केला होता की, ती आणि अजय रिलेशनशिपमध्ये होते.

इतकंच नाही तर अजयनं तिला अनेक लव्हलेटरही लिहिली होती. रवीनाने असं मुलाखतीत सांगितल्यावर अजय तिच्यावर खूपच भडकला आणि त्यानं रवीनाला खूप काही सुनावलं. अजयने त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीची कॉपी सोशल मीडियावर आजही फिरत असते.

अजय रवीनाची ती मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर तिच्यावर प्रचंड भडकला होता. त्याने एका मुलाखतीमध्ये त्याचा राग व्यक्तही केला होता. त्यावेळी अजयने रवीनाला सायकियाट्रिस्टची गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं. अजयला जेव्हा त्याने तिला लिहिलेल्या लव्हलेटरबद्दल विचारण्यात आले.

तेव्हा तो म्हणाला,'पत्रं, कोणती पत्रं? त्या मुलीला सांगा जर तिच्याकडे ती पत्र असतील तर ती जाऊन छाप. मला देखील ती वाचायची आहेत. तिच्या डोक्यात नेमकं काय चाललं आहे हे मला देखील कळेल.'

अजय पुढे म्हणाला,'आमच्या दोघांची कुटुंब एकमेकांची अनेक वर्षांपासून मित्र आहेत. माझी बहीण निलमची ती मैत्रीण आहे. त्यामुळे ती आमच्या घरी यायची. तेव्हा तिनं माझ्याशी वाईट वागायला सुरुवात केली. परंतु आम्ही तिला घराबाहेर काढू शकत नव्हतो. मी कधीही तिच्याशी जवळीक साधली नाही.

तिला विचार मी कधी तरी तिला फोन केला होता का किंवा कधी मी स्वतःहून तिच्याशी बोलायला गेलो. माझं नाव ती फक्त प्रसिद्धीसाठी वापरत आहे. तिनं आत्महत्येचा जो प्रयत्न केला होता, तो देखील पब्लिसिटी स्टंटच होता.'

या मुलाखतीमध्ये अजयनं रवीनाबरोबर त्याचं रिलेशन असल्याचं सपशेल नाकारलं. इतकंच नाही तर तुम्हा दोघांमध्ये नेमकं काय सुरू आहे. तुम्ही एकमेकांना माफ करून पुढे का नाही जात, असं विचारलं असता अजयने सांगितलं की, माफी? असं विचारून तुम्ही मस्करी करत आहात. इथं प्रत्येकाला माहिती आहे की, ती अत्यंत खोटारडी आहे.

मूर्खासारख्या तिच्या वक्तव्यांमुळे मला काहीच फरक पडत नाही. परंतु यावेळी मात्र तिने साऱ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. मला तिला एक सल्ला द्यावासा वाटत आहे, स्वतःला तिनं एका चांगल्या मनोविकारतज्ज्ञाला दाखवायला हवे आणि तिच्या डोक्यावर इलाज करून घ्यायला हवा. नाही तर एक दिवस तिला वेड्यांच्या रुग्णालयात भरती करावं लागेल. तिला डॉक्टरकडे मी स्वतः घेऊन जाईन.'

टॅग्स :Raveena TandonAjay Devgn