
Alka Yagnik: अलका याज्ञिकने रागाच्या भरात आमिरला रुममधुन लावलं होतं हाकलून...
1988 मध्ये आलेल्या 'कयामत से कयामत तक' या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तो त्याच्या पहिल्याच चित्रपटापासून सर्वांचा आवडता बनला. या चित्रपटाला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. गायिका अलका याज्ञिकने आमिर खानशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे.
अलका याज्ञिकने 'कयामत से कयामत तक'च्या अनेक गाण्यांना आवाज दिला आहे. त्यांनी गायलेली गाणी आजही खूप आवडतात. जेव्हा ती या चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड करण्यासाठी गेली तेव्हा तिने चित्रपटाचा मुख्य नायक आमिर खानला खोलीतून हाकलून दिले होते, नंतर तिला माफीही मागावी लागली.
एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, अलका याज्ञिकने चित्रपटाशी संबंधित एक जुनी घटना आठवली आणि म्हणाली, “मला आठवतं, मी ‘गजब का है दिन’ गाणं रेकॉर्ड करत असताना आमिर खान माझ्यासमोर बसला होता. तो तेव्हा नवीन होता, त्यामुळे मी त्याला ओळखत नव्हते. मला थोडे विचलित वाटले आणि मला वाटले की तो एक चाहता आहे. म्हणून मी खूप प्रेमाने त्याला खोली सोडायला सांगितले.
अलका याज्ञिक पुढे म्हणाल्या, “गाणे रेकॉर्ड केल्यानंतर मन्सूर खानने माझी आमिर खानशी ओळख करून दिली आणि तो चित्रपटाचा नायक असल्याचे सांगितले. मला खूप लाज वाटली आणि लगेच मी त्याची माफी मागितली. आमिर हसला आणि म्हणाला - काही हरकत नाही मॅडम. मला हा प्रसंग चांगलाच आठवतो.'