सह-कलाकाराला जास्त फुटेज मिळू नये म्हणून श्रीदेवी जेव्हा थेट त्यांचे सीन्संच कट करायला लावायची तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

खरंतर श्रीदेवीच्या बाबतीत असं म्हटलं जायचं की ती सिनेमामध्ये तिच्यापेक्षा तिच्या सहकलाकाराला जास्त फुटेज मिळत असेल तर खुप अस्वस्थ व्हायची..

मुंबई- दिवंगत बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी सगळ्यात यशस्वी अभिनेत्रींमधील एक.. श्रीदेवीने तिच्या अभिनय आणि डान्सच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीवर बराच काळ राज्य केलं..श्रीदेवी भलेही आज आपल्यात नाही मात्र मोठ्या पडद्यावरील तिच्या जबरदस्त अभिनयाला आजही कोणी विसरु शकत नाही..श्रीदेवीने हिंदी सिनेमांव्यतिरिक्त तमिळ, तेलुगु, कन्नड भाषेच्या सिनेमांमध्येही काम केलं.. २०१३ या वर्षी श्रीदेवीला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं गेलं.. तीने तिच्या सिने-कारकिर्दीत ३०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं..आज आम्ही तुम्हाला असं काही सांगणार आहोत जे फार कमी लोकांना माहित असेल..

हे ही वाचा: लॉकडाऊनमध्ये तुमच्या प्रिय व्यक्तिला मिस करताय? तर मग पल्लवी पाटीलच्या या गाण्याशी व्हाल एकरुप

खरंतर श्रीदेवीच्या बाबतीत असं म्हटलं जायचं की ती सिनेमामध्ये तिच्यापेक्षा तिच्या सहकलाकाराला जास्त फुटेज मिळत असेल तर खुप अस्वस्थ व्हायची..तिला ते अजिबात सहन व्हायचं नाही..

Sridevi's Teary Message to Her Pak Co-Stars Adds a Healing Touch ...

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, श्रीदेवी सिनेमाच्या दिग्दर्शकांना सांगून तिच्या सहकलाकारांचे सीन्सपण थेट कट करायला सांगायची..श्रीदेवीला जेव्हा असं वाटायचं की तिचा सहकलाकार तिच्या कामाला ओव्हरशॅडो करेल तेव्हा ती त्यांचे सीन्संच कमी करुन टाकायची...

Sridevi Lost Cool When Asked About Undergoing Plastic Surgery ...

विशेष म्हणजे श्रीदेवी हे नाव त्यावेळी खूप मोठं होतं..त्यामुळे सिने-दिग्दर्शकाला ती सांगेल ते ऐकावं लागायचं..तिचं न ऐकणं त्यांच्या सिनेमासाठी भारी पडू शकतं कारणं श्रीदेवी त्याकाळची नंबर वन हिरोईन होती आणि तिचे लाखो चाहते होते..

 

श्रीदेवीने 'जुली' या हिंदी सिनेमातून बाल-कलाकार म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं..श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवीने 'धडक' यासिनेमाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलंय..

Huusband of tragic Bollywood star Sridevi pays tribute | Daily ...

२०१८मध्ये फेब्रुवारी महिन्यात दुबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये श्रीदेवीचा मृत्यु झाला.. पुतण्या मोहित मारवाच्या लग्नाच्या निमित्ताने ती दुबईमध्ये गेली होती..जिथे एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडुन तिचा मृत्यु झाला.. श्रीदेवीचा मृत्यृ आजही तिच्या चाहत्यांचा मनात संशय निर्माण करतो..

Remembering Sridevi: A year on, the shock has not worn off ...

when bollywood actress sridevi used to cut her costar senses  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when bollywood actress sridevi used to cut her costar senses