'या' अभिनेत्रीला जायचंय राहुल गांधी यांच्यासोबत डेटवर

वृत्तसंस्था
रविवार, 3 मार्च 2019

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरचा विवाह अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत झाला हे तुम्हा सर्वांना माहिती असेलच. आता करीना कपूरने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरचा विवाह अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत झाला हे तुम्हा सर्वांना माहिती असेलच. आता करीना कपूरने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली.

करीना कपूरने अभिनेता अभिषेक बच्चनसोबत 'रेफ्यूजी' चित्रपटातून पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये 2000 मध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. काही महिन्यांपूर्वी करीनाने सैफ अली खानसोबत विवाह केला. मात्र, आता तिने डेटवर जाण्यासाठी राहुल गांधी यांच्या नावाला पसंती दिली. याबाबत करीना कपूर म्हणाली, ''राहुल गांधी आणि सैफ अली खान हे दोघेही त्यांच्या क्षेत्रातील मोठी व्यक्ती आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत डेटवर जाण्यास माझी पसंती असेल''. 

दरम्यान, करीना कपूरने तिची ही इच्छा उघडपणे व्यक्त केल्याने राहुल गांधींकडून काय प्रतिक्रिया येत हेच पाहावं लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When Kareena Kapoor wanted to date Rahul Gandhi