
Entertainment News : हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. अनेक मालिका, चित्रपट, नाटक तिच्या कसदार अभिनयाने गाजले आहेत. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. विशेष म्हणजे अभिव्यक्तीच्या आधारावर अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे ती कायमच सोशल मीडियावर आपल्याला सक्रिय दिसते. नुकताच तिने एक व्हडिओ इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला असून प्रेमातील एक गम्मत तिने दाखवली आहे.
काही दिवसांपूर्वीच हेमांगीने (hemangi kavi) एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये एकदा देखणा मुलगा बाजुने गेल्यावर काय होतं हे तिने नजरेने इशारे करून दाखवलं होतं. आताही तिने अशीच नजाकत केली आहे. पण यंदा मात्र प्रेमाच्या पुढच्या पायरीवर ती गेली आहे. बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीला पाहतो आणि तिच्या प्रेमात पडतो. यालाच इंग्लिश मध्ये 'love at first site' म्हणतात. पण जेव्हा आपण अशा व्यक्तीच्या प्रेमात पडतो तेव्हा त्या व्यक्तीला पुन्हा भेटण्यासाठी, पाहण्यासाठी मन अधीर झालेलं असतं. अशावेळी जेव्हा तो पुन्हा दिसतो तेव्हा मनात उठणाऱ्या प्रेमाच्या लाटा, चेहऱ्यावरचे बदलणारे भाव आणि डोळ्यांमध्ये आलेली गुलाबी लाली कशी असते. याचं अचूक वर्णन हेमांगीने एका व्हिडिओतून केलं आहे.
संगीत दिग्दर्शक ए आर रहमान यांनी संगीतबद्द केलेलं एक प्रसिद्ध प्रेम गीत तिने या व्हिडिओसाठी वापरले आहे. तसेच 'पहिल्यांदा त्याचा प्रेमात पडल्यांनंतर जेव्हा तो दुसऱ्यांदा दिसला तेव्हा...' हे कॅप्शन हेमांगीने या व्हिडीओला दिले आहे. हेमांगी म्हणते, ' When u see him 2nd time after 1st sight love! This bgm from Mani Ratnam' s #bombay though! A. R. Rehman is and and and Arvind Swami ya!' या व्हिडिओला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला असून हेमांगीने डोळ्यांनी केलेल्या अदा आणि अभिनय हा पाहण्यासारखा आहे. या व्हिडीओने अनेक चाहते घायाळ झाले आहेत.