Rakhi Sawant: तु नेमक्या कोणत्या धर्माची? राखीने ठेवलाय 'रोजा' आणि केली इफ्तार पार्टी.. नेटकरीही सुसाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rakhi sawant news, rakhi sawant, rakhi sawant husband

Rakhi Sawant: तु नेमक्या कोणत्या धर्माची? राखीने ठेवलाय 'रोजा' आणि केली इफ्तार पार्टी.. नेटकरीही सुसाट

Rakhi Sawant News: राखी सावंत हि काहीतरी गोष्टी करून सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री. राखी सावंत गेले अनेक दिवस कोणत्याही प्रकरणात चर्चेत नव्हती. पण नुकतीच राखी सावंत एका नव्या प्रकरणामुळे चर्चेत आलीय.

राखी सावंतने धर्म बदलल्यानंतर पहिल्यांदाच बुरख्यात दिसली. विरल भयानीने राखीचे व्हिडिओ शेयर केलेत. या व्हिडिओत राखी बुरखा परिधान करून खास पोज देत आहे.

(Which religion do you belong to? Rakhi kept 'roja' and doing iftar party in ramadan)

हेही वाचा: नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

राखीने बुरख्यात एंट्री केली तोच तिचा स्कार्फ हवेने उडाला. राखीने धावत जाऊन तो स्कार्फ पकडला. पुढे राखी मीडियासमोर बोलताना दिसली कि,"मी रोजा सोडायला आली आहे."

याशिवाय दुसऱ्या व्हिडिओत रमजान सुरू असताना, नुकतीच धर्मांतरित झालेल्या राखी सावंतने इफ्तार पार्टी करून तिचा उपवास सोडतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे!! आणि सर्वांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या.

या व्हिडिओमध्ये राखी जमिनीवर बसलेली दिसत आहे. याशिवाय राखी सोबत तिचा मित्र आणि मैत्रीण दिसत आहेत.

उपवास सोडण्यापूर्वी राखीने तिच्या मैत्रिणींसोबत अल्लाची पूजा केली आणि खजूर खाऊन उपवास सोडला.

मात्र, त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. मात्र या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी राखीला ट्रोल केलंय.

एका यूजरने लिहिले की, 'तुम्ही कितीही नौटंकी केली तरी तुमचं कधीच समाधानी होत नाहीत. दुसऱ्याने लिहिले, 'ती कधी कधी हिंदू असते. कधी ख्रिश्चन तर कधी मुस्लिम.

एकाने लिहिले, 'मला वाटते की तुम्ही बुरख्याचा आदर करत नाहीये, त्यामुळे हि सर्व नाटकं करून काही होणार नाही. तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाहीत." अशाप्रकारे युजर्सनी राखीला ट्रोल केलं गेलंय

मनोरंजन विश्वातील ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

राखी आणि तिच्या नवऱ्यामध्ये बरेच वाद सुरु आहेत. तिने आदिल अनेक गंभीर आरोप केले आहेत. आदिल सध्या तुरुंगात आहे. त्याच्यावर केसेस सुरु आहे.