नवीन सिझनमध्ये कोण असतील करणचे नवीन पाहुणे? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

कॉफी विथ करणच्या सहाव्या सीझनमध्ये पहिल्या भागात कोण येणार याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. करणचे पहिले पाहुणे विराट-अनुष्का असतील, अशी चर्चा होती...

करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा जरासा हटके असणारा सेलिब्रिटी टॉक शो बघता बघता प्रेक्षकांमध्ये इतका भाव खाऊन गेला की, आता या टॉक शोचा सहावा सीझन या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये या शोचे चित्रीकरण सुरू करण्यात येईल आणि ऑक्‍टोबरमध्ये हा शो प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

koffee with karan season 6

करणच्या या टॉक शोचे सगळ्यात मोठे आकर्षण असते ते म्हणजे शोसाठी येणारे सेलिब्रिटी.. करण कधीच अशा तशा सेलिब्रिटींना आपल्या शोमध्ये बोलवत नाही. त्याच्या आत्मचरित्रातच त्याने तसं लिहीलंय की त्याच्या या शोसाठी त्याच्या शोला साजेसे असेच सेलिब्रिटी येतात.

मागच्या सीझनमध्ये कंगनादेखील याबद्दल बोलली होती, तर कॉफी विथ करणच्या सहाव्या सीझनमध्ये पहिल्या भागात कोण येणार याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. करणचे पहिले पाहुणे विराट-अनुष्का असतील, अशी चर्चा होती; पण ऑक्‍टोबरमध्ये दिग्दर्शक म्हणून करणचा पहिला चित्रपट "कुछ कुछ होता है'ला 20 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळे त्याच्या पहिल्या भागात त्याचे जवळचे मित्र शाहरूख, काजोल आणि राणी मुखर्जी येतील, अशी चर्चा आहे. यानिमित्ताने प्रेक्षकांना कदाचित "कुछ कुछ'ची जादू आणि बिहाइंड द सीन्स अनुभवता येणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who are the new guest of karan in koffee with karan