
व्हिडीओ करणारे अनेकजण टिक-टॉक स्टार बनले आहेत. अशीच एक जोडी आहे जी सध्या सोशल मीडियावर फेमस झाली आहे. ही जोडी आहे जुळ्या बहिणींची. जाणून घ्या कोण आहेत या जुळ्या स्टार बहिणी !
मुंबई : सोशल मीडिया हे आता तरुण पिढीसाठी वरदानच ठरलं आहे. प्रसिद्ध होण्यासाठी किंवा स्वत: चे टॅलेंट जगासमोर आणण्यासाठी सोशल मीडिया हा उत्तम मार्ग आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट आणि टिक-टॉक हे आता ट्रेंडिग अॅप बनले आहे. टिक-टॉक अॅप हे फक्त मनोरंजनासाठी नसून या अॅपच्या माध्यमातून अनेकजण आपलं टॅलेंट पुढे आणत आहेत. यावर व्हिडीओ करणारे अनेकजण टिक-टॉक स्टार बनले आहेत. अशीच एक जोडी आहे जी सध्या सोशल मीडियावर फेमस झाली आहे. ही जोडी आहे जुळ्या बहिणींची. जाणून घ्या कोण आहेत या जुळ्या स्टार बहिणी !
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणे इतकेही सोप्पे काम नाही. सोशल मीडियावरील युजरर्संना काहीतरी नवीन हवे असे. त्यामुळे काहीतरी वेगळे करण्याचा सोशल मीडियावरील फेमस व्यक्तींचा प्रयत्न असतो. सध्या चर्चा आहे ती चिंकी-मिंकी या जुळ्या बहिणींची. चिंकी- मिंकी या बहिणींचं खरं नाव आहे सुरभी आणि समृद्धी मेहरा.
या जुळ्या बहिणी फक्त मजेशीर टिक-टॉक व्हिडीओ करत नाहीत तर, इन्स्टाग्रामवर फॅशन, लाइफस्टाइल, डान्स यांचे मार्गदर्शनही करतात. त्या जुळ्या बहिणी दिसायला हुबेहुब असल्याने लोकांना त्यांच्याविषयीते खूप आर्कषण आहे. या दोन्ही बहिणी त्यांच्या फॅशन आणि स्टाइलसाठी फेमस आहेत.
इन्स्टाग्राम आणि टिक-टॉक वर त्यांचे लाखो फॉलोअरर्स आहेत. या दोघी मुळच्या उत्तर प्रदेशातील नॉएडाच्या आहेत. विशेष म्हणजे एका साइटने दिलेल्या माहितीनुसार पुण्याच्या सिंम्बॉयसीस कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत.
त्या वेगवेगळे इव्हेंन्ट करतात. वयाच्या 10 वर्षापासूनच त्या अभिनय करत आहेत. अभिनयासह त्या दोघी उत्तम डान्सही करतात. अनेक ब्रॅंडसाठी त्यांनी मॉडेलिंगही केलं आहे. वरुण आणि साराच्या 'जुडवा 2' या चित्रपटाच्या ट्रेलर प्रमोशनसाठीही त्यांना बोलवलं आहे.
चिंकी- मिंकी या दोघी नुकत्याच कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्येही पोहोचल्या होत्या.