Urvashi Rautela Birthday: ऋषभ की नसीम? कोणासाठी उर्वशीचे हृदय धडधडते, उर्वशीच्या या खास गोष्टी माहितीये का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urvashi Rautela

Urvashi Rautela Birthday: ऋषभ की नसीम? कोणासाठी उर्वशीचे हृदय धडधडते, उर्वशीच्या या खास गोष्टी माहितीये का?

25 फेब्रुवारी 1994 रोजी कोटद्वार, उत्तराखंड येथे जन्मलेली उर्वशी रौतेला तिच्या फॅशन सेन्स आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सिंग साहब द ग्रेट या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपला प्रवास सुरू करणारी उर्वशी सनम रे, ग्रेट ग्रँड मस्ती, काबिल आणि पागलपंती यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली आहे.

कामापेक्षा उर्वशीच्या अफेअरचीच जास्त चर्चा आहे. खरे तर तिचे नाव क्रिकेटपटू ऋषभ पंतशी जोडले गेले आहे. पंतच्या अपघातानंतर उर्वशीला तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे अनेकदा ट्रोलही करण्यात आलं होतं. मात्र, दोघांनीही या विषयावर कधीही मौन सोडले नाही.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की उर्वशीच्या कुटुंबातील एकही सदस्य आजपर्यंत ग्लॅमरच्या दुनियेत आलेला नाही. असे करणारी ती पहिला व्यक्ती आहे. उर्वशीचे नाव ऋषभ पंतसोबत जोडले गेले जेव्हा तिने एका मुलाखतीत आरपी नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला आणि तिच्या ब्रेकअपची कहाणी सांगितली.

उर्वशीने आरपीचे पूर्ण नाव घेतले नाही, परंतु लोकांनी त्याला ऋषभ पंत समजले. उर्वशी आणि ऋषभचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघे एका रेस्टॉरंटमध्ये स्पॉट झाले होते.

ऋषभ पंत सारखेच उर्वशीसोबत आणखी कोणाचे नाव जोडले जात असेल तर ते पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाह आहे. नुकतेच उर्वशीने नसीमला खूप एक वेगळ्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिने ट्विटवर लिहिले, 'नसीम शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मानद डीएसपी पद बहाल केल्याबद्दल अभिनंदन.

त्याचवेळी उर्वशी आशिया कप 2022 चा भारत-पाक सामना पाहण्यासाठी आली होती. तिने स्वतःचा आणि नसीम शाहचा एक एडिटेड वीडियो सोशल मीडियावर पोस्ट केला होता, त्यानंतर तिचे नाव नसीम शाहशी जोडले जाऊ लागले.

विशेष म्हणजे केवळ ऋषभ पंत आणि नसीम शाहच नाही तर उर्वशीचे नाव इतर अनेक क्रिकेटपटूंसोबत जोडले गेले आहे. या यादीत हार्दिक पांड्याचाही समावेश आहे. दोघांची भेट आयपीएल मॅच पार्टीदरम्यान झाली होती.

यानंतर उर्वशी अनेकवेळा हार्दिकला चिअर करताना दिसली. मात्र, उर्वशीचे नाव गायक गुरु रंधावासोबतही जोडले गेले आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे उर्वशी नेहमीच स्वत:ला सिंगल असल्याचे सांगते.

टॅग्स :Birthdayurvashi rautela