कोण होणार 'मधुबाला'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

इम्तियाज अली बेगम मुमताज जेहान देहलवी म्हणजे मधुबाला यांचा बायोपिक प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत.

नवी दिल्ली : दिग्दर्शक इम्तियाज अलीने बॉलीवूडला ‘लव आज कल’, ‘रॉकस्टार’, ‘हायवे’, ‘जब वी मेट’सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता इम्तियाज सध्या नव्या चित्रपटामुळे चर्चेचा विषय ठरतो आहे. इम्तियाज बेगम मुमताज जेहान देहलवी म्हणजे मधुबाला यांचा बायोपिक प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत.

आता हा बायोपिक चित्रपट स्वरूपात असणार की वेबसीरिज स्वरूपात याचा अजूनही खुलासा झालेला नाही. यासाठीचे अधिकृत हक्क इम्तियाजने मिळवले आहेत. आकर्षक सौंदर्य, दमदार अभिनय, उत्तम व्यक्तिमत्त्व या साऱ्या गुणांमुळे मधुबाला यांचं नाव आजही बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहे.

खरं तर त्यांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारणं ही प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा आहे. पण आता कोणत्या अभिनेत्रीला मधुबाला यांची भूमिका साकारण्याची संधी मिळणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who will become 'Madhubala'?