Happy Birthday Irrfan Khan : ...यामुळं इरफान ठरला बॉलिवूडचा अविश्वसनीय अभिनेता!

टीम ई-सकाळ
Tuesday, 7 January 2020

ज्या अभिनेत्याचे डोळे चित्रपटाच्या डायलॉगपेक्षा जास्त बोलतात, अशा मोजक्या अभिनेत्यांपैकी इरफान एक.

Happy Birthday Irrfan Khan : ''मला लोकांचं मनोरंजन करायचं आहे, पण काही गोष्टींसोबत!''

दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम करण्याची इच्छा याच गोष्टींनी इरफान खानला सर्वोत्तम अभिनेता म्हणून वेगळी ओळख दिली. इरफानचा जन्म राजस्थानमधील जयपूरचा. साहबजादे इरफान अली खान असं त्याचं पूर्ण नाव. अभिनेता व्हायचं ठरवल्यानंतर एम.ए. ते नॅशनल स्कूल ऑफ ड्राम (एनएसडी) मधील स्कॉलरशिप मिळविण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. आणि यामुळेच तो फक्त बॉलिवूडच नाही, तर हॉलिवूडमधीलही उत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये गणला जात आहे. 

Image may contain: 1 person, close-up

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बॉलिवूडवर खान मंडळींनी राज्य केलं, पण इरफान त्यांच्यापेक्षा वेगळा ठरला. हिरो म्हटलं की स्मार्ट लूक, बॉडी असा साधारण विचार आपल्या मनात येतो. मात्र, अशा प्रकारची एकही क्वॉलिटी नसतानाही कामाप्रती असलेली निष्ठा आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याने अनेक छोट्या भूमिकाही अजरामर केल्या. 

Image may contain: 1 person, close-up

‘बनेगी अपना बात’, ‘श्रीकांत’, ‘स्टार बेस्टसेलर्स’ यासारख्या टीव्ही मालिकांमधून त्याने आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. 'एक डॉक्टर की मौत' आणि 'सच अ लाँग जर्नी' यामधील त्याच्या अभिनयाने अनेकांना इरफान खान नावाची भूरळ पाडली. 

- रितेश करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बायोपिकची निर्मिती?

बॉलिवूडमध्ये पदार्पणानंतर त्याने 'तलवार', 'लाइफ इन अ .. मेट्रो', 'मकबूल' यासारख्या चित्रपटात सहजतेने पण अत्यंत गंभीर भूमिका साकारल्या. प्रचंड गुंतागुंतीच्या आणि सहजता करता येतील अशा भूमिका कधीकधी एकाच चौकटीमध्ये येतात, असं इरफान एके ठिकाणी म्हटला होता. 

Image may contain: 1 person, beard

इरफानने अनेकवेळा सहकलाकाराची भूमिका साकारली. पण त्याच्या अभिनयामुळे सहकलाकार काय जादू निर्माण करू शकतात, हे अनेकवेळा दिसून आले आहे. कारण अनेक चित्रपट आपटले असले तरी त्यातील इरफानच्या अभिनय नावाजला गेला आहे. प्रत्येक चित्रपटात इरफानने त्याच्या अभिनयाची एक वेगळी छाप पाडली आहे. 

Image may contain: 1 person, glasses and text

जेव्हा एखादा कलाकार त्याच्या कामामध्ये जीव ओतून काम करतो, तेव्हा बॉक्स ऑफिसचे आकडे काय बोलतात त्याची चिंता वाटत नाही. जर त्याचे काम चांगले असेल, तर प्रेक्षकच नाही, तर टीकाकारही त्याच्या कामाची दखल घेतात. 

- #JNUAttack : 'लिडर हवा तर असा' सोनमने केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक

ज्या अभिनेत्याचे डोळे चित्रपटाच्या डायलॉगपेक्षा जास्त बोलतात, अशा मोजक्या अभिनेत्यांपैकी इरफान एक. त्यामुळे त्याला हॉलिवूडचे दरवाजे उघडले गेले. ‘न्यूयॉर्क, आय लव्ह यू’, ‘ए माईटी हार्ट’, ‘लाइफ ऑफ पाय’, ‘द नेमसेक’ ही त्याची हॉलिवूडमधील कामगिरी. ‘ज्युरॅसिक वर्ल्ड’ आणि ‘द अमेझिंग स्पायडर मॅन’ मधील त्याचा खास कॅमिओ हा तितकाच चकीत करणारा ठरला असून ‘इन्फर्नो’ या आगामी हॉलिवूडपटातही तो झळकणार आहे. 

Image may contain: 3 people, people smiling, people sitting and indoor

असं म्हणतात की, आठवड्यातून एक दिवस त्याला हॉलिवूडच्या स्क्रीप्ट वाचनासाठी द्यावा लागतो. माणसाच्या आयुष्यात महत्त्वकांक्षा, तेजस्वीपणा आणि निर्भयता या तीन गोष्टी असतील, तर कामातील परफेक्शन आपोआप येते, असं इरफानचं म्हणनं आहे. 

Image may contain: 2 people, people standing, beard and outdoor

- Happy Birthday Rahman : 'हा' ठरला रेहमानचा टर्निंग पॉईंट!

त्याच्या अष्टपैलू अभिनयाची झलक त्याच्या कामात दिसून येते. कारण एकदा साकारलेली भूमिका त्याने आतापर्यंत दुसऱ्या कोणत्याच चित्रपटात साकारली नाही. प्रत्येक चित्रपटात वेगळी भूमिका करणारा अभिनेता इरफानशिवाय दुसरा कुणी इंडस्ट्रीत सापडणार नाही. वय आणि अभिनय शैली या दोन गोष्टी त्याच्यासाठी गौण ठरतात. 

Image may contain: 3 people, people smiling, people standing and sunglasses

‘पीकू’, ‘पानसिंग तोमर’, ‘किस्सा’, ‘द लंचबॉक्स’ या चित्रपटातील त्याच्या भूमिका आठवणीत राहतील अशाच आहेत. समीक्षकांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. एके ठिकाणी त्याच्याबाबतीत असे लिहले होते की, तो केवळ कंटेंटचा राजा नाही, तर तो पडद्यावर पात्रं जिवंत करणारा कलाकार आहे.

Image may contain: 1 person, sitting and indoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Irrfan Khan is called the most incredible actor of Bollywood