नाईट क्‍लबमध्ये राष्ट्रगीत का नाही? : राम गोपाल वर्मा

वृत्तसंस्था
शनिवार, 3 डिसेंबर 2016

सर्वोच्च न्यायालयान काही दिवसांपूर्वी देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावे, असे निर्देश दिले. यानंतर बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मानेदेखील चर्चेत आला आहे. या निर्णयाविरोधात राम गोपाल वर्माने पाच-सहा ट्विट करत गॅसिपला एक नवा विषय दिला. राम गोपाल वर्मा यापूर्वीही विविध विषयांवर विसंगत ट्विट करत चर्चेत राहिला आहे.

राम गोपाल वर्माच्या सर्व ट्विटमध्ये त्याने या निर्णयाचा कडवा विरोध केल्याचे दिसते.

""चित्रपटगृहांमध्ये सक्तीने लावण्यात येणारे राष्ट्रगीत "नाईट क्‍लब'मध्येही का नाही लावले जात? या सक्तीमध्ये टेलिव्हीजन मालिका, रेडिओ कार्यक्रमांच्या सुरुवातीलाही राष्ट्रगीत लावले पाहिजे? राष्ट्रगीत फक्त चित्रपटगृहांपुरतेच मर्यादित का असावे? कोणत्याही दुकानदाराकाडून ग्राहकांना दुकानात येण्यापूर्वी राष्ट्रगीताचा व्हिडिओ पाहण्यासाठी का विचारले जात नाही?,'' असे काही प्रश्न वर्मा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केले आहेत.

""ज्याप्रमाणे तंबाखू न खाण्याच्या जाहिराती चित्रपटादरम्यान दाखवल्या जातात त्याचप्रमाणे सर्वच चित्रपटातील मुख्य कलाकारांवरही दोनदा म्हणजेच, चित्रपटाआधी आणि चित्रपटाच्या मध्यांतरात राष्ट्रगीत म्हणण्याची सक्ती केली गेली पाहिजे,''असेही राम गोपाल वर्मा यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

संपूर्ण देशभरातील चित्रपटगृहांसाठी हा नियम यापूर्वी नव्हता, केवळ महाराष्ट्रातच चित्रपट सुरू होण्यापूर्वी चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवणे बंधनकारक होते. राष्ट्रगीत, ते देखील चित्रपटाच्या पडद्यावर, सुरू असताना उभे राहायला हवे असा कोणताही कायदा वा नियम नाही. "प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्‌स टू नॅशनल ऑनर ऍक्‍ट' या कायद्यात राष्ट्रसन्मानाची प्रतीके सांभाळावीत कशी, त्यांचा आदर कसा करावा या नियमांचा स्पष्ट उल्लेख नाही. राष्ट्रगीत म्हणणाऱ्यास रोखण्याचा प्रयत्न झाला तर मात्र तो राष्ट्रचिन्हाचा, राष्ट्रगीताचा अपमान ठरतो आणि तो करणाऱ्यास तुरुंगवास घडू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या समारंभात राष्ट्रगीत प्रत्यक्ष गायले जात असेल आणि उपस्थितांनी उभे राहून मानवंदना दिली नाही तर देखील तो राष्ट्रगीताचा अपमान ठरतो. परंतु हा नियम चित्रपटाच्या पडद्यावर अप्रत्यक्षपणे वाजविल्या जाणाऱ्या राष्ट्रगीतप्रसंगी लागू होत नाही. त्यामुळे चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरू असताना उभे राहवे किंवा न राहवे याबाबत संभ्रमाचे वातावरण देशात निर्माण होत आहे.

Web Title: Why not national anthem in bars and clubs: Bollywood director Ram Gopal Varma