परमसिंह सोशल मीडियापासून दूर... 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

सिनेइंडस्ट्रीत वावरणारे कलाकार सध्या सोशल मीडियावरील आयुष्यच अधिक महत्त्वाचं मानताना दिसतात. सोशल मीडियावर ते आपल्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्‍टपासून स्वत:ची स्टाईल स्टेंटमेंट व विविध माहिती देत असतात. मात्र लाईफ ओके वाहिनीवरील "गुलाम' मालिकेतील परमसिंह सोशल मीडियापासून चार हात लांब राहतो. इतकंच नाही तर फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्‌स ऍपवरही त्याचं अकाऊंट नाहीये. असा काय हा... पण, त्याला साधेपणाने राहायला आवडते. तो म्हणतो की, व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाचं विभाजन करणारी एक सीमारेषा असते. मला जास्तीत जास्त काम करायला आवडते आणि सोशल मीडियावर सेल्फी काढणाऱ्या चाहत्यांपेक्षा मला माझ्या कामाद्वारे स्वताचा चाहता वर्ग तयार करायला आवडेल. म्हणूनच मी फेसबुक, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्‌स ऍपवर नाहीये. मी ट्विटरवर आहे. पण माझी मालिका आणि माझ्या व्यक्तिरेखेची माहिती देण्यापुरता. त्यावर मी दुसरंतिसरं काही पोस्ट करीत नाही.  

Web Title: why Param Singh stays away from social media