सनी देओलने त्याच्या मुलाचं टोपणनाव ठेवलं होतं 'रॉकी' कारण...

वृत्तसंस्था
Wednesday, 28 August 2019

बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सची चांगलीच शर्यत चालू आहे. जवळपास सर्वच तारकांची मुलं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाल्याचं दिसून येतं. अभिनेता सनी देओलचा मुलगा करणही 'पल पल दिल के पास' या आगामी चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे.

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सची चांगलीच शर्यत चालू आहे. जवळपास सर्वच तारकांची मुलं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाल्याचं दिसून येतं. अभिनेता सनी देओलचा मुलगा करणही 'पल पल दिल के पास' या आगामी चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. याच पार्श्वभूमीवर करण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसतोय.

'डांस इंडिया डांस' या रिअॅलि़टी शोच्या सेटवरचे अनेक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर वायरल होत आहेत. करणसोबत या चित्रपटामध्ये सहर बाम्बा मुख्य भूमिकेतून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. करण देओलचं टोपणनाव 'रॉकी' याची कल्पना सर्वांनाच आहे मात्र, हे नाव त्याला कसं पडलं? याचा खुलासा आता झाला आहे.

त्य़ाचं झालं असं की, करणचे बाबा म्हणजे सनी देओल मोठ्या पडदयावर अॅक्शनसाठी खूप प्रसिद्ध आहे. सनी हॉलिवूड अभिनेता सिल्वेस्टर स्टेलन याचा खूप मोठा चाहता आहे. साहजिकच सनी त्याच्या चित्रपटांनाही तेवढच पसंत करतो. सिल्वेस्टरची प्रसिद्ध सिरीज 'रॉकी' या नावावरुन त्याने मुलगा करणचं टोपणनाव 'रॉकी' ठेवलं. म्हणूनच करणला घरी 'रॉकी' या नावानेच बोलावलं जातं.

आता तुम्हाला यावरुन अंदाज आलाच असेल की, तो सिल्वेस्टर स्टेलन किती मोठा चाहता आहे. करणचा आगाची चित्रपट 'पल पल दिल के पास'  हा रोमँटिक ड्रामा असून तो 20 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनी देओलने या चित्रपटाचं दिर्गदर्शन केलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is why sunny deol kept his sons pet name Rocky