कंगणाच्या टिवटिवीचा परिणाम तिच्या चित्रपटावर होणार? वायफळ चर्चेमुळे वादाच्या भोवऱ्यात

कंगणाच्या टिवटिवीचा परिणाम तिच्या चित्रपटावर होणार? वायफळ चर्चेमुळे वादाच्या भोवऱ्यात

मुंबई - एव्हाना आपण सर्वांनी  कंगणाचा जयललिता यांच्या आयुष्यावर बेतलेला थलाइवी नावाचा चिञपट पाहुन रिकामे झाले असतो. थलाइवी नावाचा  चिञपट २६ जुन रोजी प्रदर्शित होणार होता. कोरोनामुळे या चिञपटाचा मुह्रर्त पुढे ढकलणयात आला आहे.  चिञपटाच्या ट्रेलरला रसिकांकडुन चांगला प्रतिेसाद मिळाला. आता तर कंगणा सुसाट सुटली आहे. तिच्याकडुन होत असलेल्या  आरोपांच्या फैरीमुळे वातावरण भलतेच पेटले आहे. 

नोव्हेंबर मध्ये रिलीज झालेल्या फस्ट लुकनंतर चि़ञटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सुरु असणा-या वादावादीचा फायदा कंगणा आपल्या चिञपटांसाठी तर करणार नाही ना, यामागे तिची कुठली खेळी तर नाही ?  चिञपटाचे निर्माते थिएटर उघडण्याची वाट पाहत आहे. विशेष म्हणजे कंगणाच्या निर्मात्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण कंगणाच्या विधानांचा परिणाम हा राजकीय, सामाजिक स्वरुपाचा आहे. आगामी काळात कंगणाचे येणारे चिञपट याचा थोडक्यात आढावा पाहु. जयललिता यांच्या जीवनावर आधारित असणारा थलाइवी नावाचा चिञपट हा हिंदी,  आणि तेलगु या भाषेत चिञित करण्यात आला आहे.  या चिञपटाचे दिग्दर्शक ए एल विजय यांनी असुन त्यांनी कंगणाकडुन चिञपटासाठी प्रचंड मेहनत करुन घेतली आहे. कंगणाला तमिळ भाषेचे व भरतनाट्मचे धडे गिरवावे लागले. तिच्याशिवाय या चिञपटात एमजी रामचंद्र यांच्या भुमिकेत अरविंद स्वामी तर करुणानिधी यांच्या भुमिकेत प्रकाशराज दिसणार आहे. यात विशेष उल्लेखलनीय बाब म्हणजे जयललिता आणि आपल्यात साम्य असल्याने कंगणाने हा चिञपट करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले. 

  विष्णु वर्धन इंदुरी आणि शैलेश आर सिंह यांनी या चिञपटाची निर्मिती केली आहे. पंगा फ्लॅाप झाल्यानंतर कंगणाला या चिञपटाकडुन विशेष अपेक्षा आहेत. यापुर्वी मागील वर्षी रिलीज झालेल्या धाकड नावाच्या एका  टिजर मध्ये हातात मशिनगन घेत मोठ्या दिमाखात कंगणाचा अनोखा लुक व्हायरल झाला होता. सोहेल मकलाई निर्मित आणि रजनीश घई दिग्दर्शित हा सिनेमा अद्याप प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. वास्तविक फेब्रुवारी २०२० मध्ये धाकड रिलीज होणे अपेक्षित होते.  शुटिंग रदद झाल्याने  निर्मात्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.  भारतीय चिञपट सृष्टीला वेगळे वळण देणारा हा चि़ञपट असल्याचे कंगणाने म्हटले आहे. 

   याशिवाय कंगणाच्या प्रदर्शित होणा-या चिञपटांच्या यादीत आणखी काही नावे आहेत. ते म्हणजे भारतीय वायुसेना आणि महिला पायलट यांच्यावर आधारित तेजस चिञपट. डिसेंबर २०२० मध्ये या सिनेमाच्या चिञिकरणाला सुरुवात होणार आहे.  या तीन चिञपटाशिवाय कंगणाने आपल्या मणिकर्णिका प्रॅाडक्शनच्या माध्यमातुन  आणखी अपराजित अयोध्या, काश्मिरवर आधारित एक चिञपट बनविणार असल्याचे सांगितले आहे. 

-

जास्त टिवटिव जाईल जड 
सध्या वादाच्या भोव-यात सापडलेल्या कंगणाने आपली वादग्रस्ते वक्तव्ये अशीच सुरु ठेवली तर तिला अनेकांच्या सामोरे जावे लागणार आहे. तिला केले जाणारे ट्रोलिंग याचा परिणाम चिञपटावर होऊ नये याची काळजी तिला घ्यावी लागणार आहे. याचेच एक महत्वाचे कारण म्हणजे तिच्यासोबत काम करण्यासाठी कुणी तयार होत नसल्याचे दिसुन आले आहे. थलाइवी, तेजस आणि धाकड याच्याशिवाय आणखी तिच्याकडे कुठलेही चिञपट नाही.

--------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com