शालिनी भारतात परतणार? सांगायला येतोय The Kerala Story चा सिक्वेल..दिग्दर्शकाने दिले संकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The Kerala Story, The Kerala Story sequel, The Kerala Story 2, The Kerala Story box office, the kerala story full movie,

शालिनी भारतात परतणार? सांगायला येतोय The Kerala Story चा सिक्वेल..दिग्दर्शकाने दिले संकेत

The Kerala Story Sequel News: द केरळ स्टोरी सिनेमा सर्वांच्या पसंतीस उतरला. सिनेमाला प्रचंड विरोध झाला तरीही प्रेक्षकांनी सिनेमाला डोक्यावर घेतलं. नुकतंच या सिनेमाने १०० कोटी क्लबमध्ये एंट्री केली.

एकूणच ज्वलंत विषयावरच्या या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. दिवसेंदिवस सिनेमाच्या कमाईचे आकडे सुद्धा गगनाला भिडत आहेत. अशातच द केरळ स्टोरी सिनेमाचा दुसरा भाग येणार का? अशी चर्चा सुरु झालीय.

(Will Shalini return to India? Coming to tell the sequel of The Kerala Story..Director gave hints)

स्वतः दिग्दर्शक - निर्माते सुदिप्तो सेन आणि विपुल अमृतलाल शाह यांनी दुसऱ्या भागाबद्दल संकेत दिले आहेत. 'द केरळ स्टोरी'चा सीक्वल असेल का, असे विचारले असता शाह म्हणाले,

"आम्हाला जो विषय मांडायचा होता तो लोकांपर्यंत पोहोचला आहे आणि प्रेक्षक त्याचे कौतुक करत आहेत. या कथेने मानवी तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले आहे.

जर याच कथेला पुढे नेणारा एखादा पॉईंट आढळला तर आम्ही विचार नक्कीच पुढच्या भागाचा विचार करू" असे शाह म्हणाले.

5 मे ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला रिलिज होऊन आता ९ दिवस झाले आहेत. या सहा दिवसात 'द केरळ स्टोरी' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. द केरळ स्टोरीची अवघ्या ९ दिवसात १०० कोटी क्लबमध्ये दिमाखात एंट्री झालीय.

निश्चितच या चित्रपटाच्या यशाचं श्रेय त्याच्या कथेला आणि त्याभोवती निर्माण झालेल्या वादाला जाते आहे. केरळ स्टोरीला सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात माऊथ पब्लिसिटी मिळत आहे.

एकीकडे भारतात अनेक राज्यात चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत असतांनाच दुसरीकडे निर्मात्यांनी द केरळ स्टोरी या चित्रपटाला इतर देशांमध्येही प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता हा चित्रपट आणखी 37 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील प्रमुख अभिनेत्री अदा शर्मानं स्वत: ही माहिती पोस्ट शेअर करत दिली आहे.