#HappyBirthdayThalaiva : थलैवा रजनीकांतला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बुधवार, 12 डिसेंबर 2018

जगभरातून रजनीकांत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून अनेक दिग्गजांनीही ट्विटरवरून रजनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

चेन्नई : चित्रपटसृष्टीचे थलैवा सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 68वा वाढदिवस! अभिनयाच्या हटके स्टाईलमुळे रजनी जगभरात प्रसिद्ध आहेत. तसेच देशासह जगभरात त्यांचे चाहतेही आहेत. ठिकठिकाणी त्यांचा वाढदिवस त्यांच्या अनुपस्थितीत साजरा होतो, इतकी त्यांची लोकप्रियता आहे.

नुकताच रजनीकांत यांचा '0.2' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. नुकतीच या चित्रपटाने चेन्नई बॉक्स ऑफिसवर बाहुबलीला ही मागे टाकले आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह रजनीकांत यांनी हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली. त्यांचे हम, रोबो, बुलंदी, चालबाज, लिंगा हे काही गाजलेले चित्रपट आहेत.  

जगभरातून रजनीकांत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून अनेक दिग्गजांनीही ट्विटरवरून रजनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

 

 

 

Web Title: Wishes to Rajanikanth on his Birthday