टायगरला केलं प्रपोझ ;‘माझ्याशी लग्न कर आणि युकेला राहायला ये’

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 12 December 2020

कमी कालावधीत प्रचंड लोकप्रिय झालेल्या टायगरनं मोठ्या संख्येनं फॅन फॉलोअर्स तयार केला आहे.

मुंबई - अॅक्शन आणि जबरदस्त डान्सर यामुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता म्हणून टायगर श्रॉफची ओळख आहे. कमी कालावधीत प्रचंड लोकप्रिय झालेल्या टायगरनं मोठ्या संख्येनं फॅन फॉलोअर्स तयार केला आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी त्यानं खुप मेहनत घेतली आहे. जिद्द, संघर्ष आणि सातत्य याचे दुसरे नाव टायगर श्रॉफ आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस केला आहे. ऋतिक रोशन बरोबर आलेला त्याच्या एका चित्रपटानं मोठ यश मिळवलं. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नेहमी उत्साही आणि नवनवीन गोष्टींमध्ये रस घेणा-या टायगरला त्याच्या एका चाहतीनं प्रपोझ केलं आहे. त्यामुळे तो अधिकच चर्चेत आला आहे. यावर टायगरनंही तिला खुप छान उत्तर दिले आहे. त्याचं ते उत्तर अनेकांना भावलं आहे.

टायगरला प्रपोझ करणारी तरुणी म्हणाली, माझ्याशी लग्न कर आणि युकेला राहायला ये. त्यावर टायगर म्हणाला, ‘कदाचित आणखी काही वर्षांनी, जेव्हा मी तुझी व्यवस्थित साथ देऊ शकेन. तोपर्यंत खूप काही शिकायचंय आणि कमवायच आहे. त्यानंतर मी सांगेन. अशी प्रतिक्रिया त्यानं त्या प्रपोझ करणा-य़ा मुलीला दिली आहे.टायगरचा पुढचा चित्रपट ‘हिरोपंती’ असणार आहे.  या चित्रपटाचा तो सिक्वेल करत आहे. ‘गणपत’ हा त्याचा आणखी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

त्यामुळे पुढील वर्षी टायगर बिझी असल्याचे दिसते आहे. कारण त्याच्याकडे असणा-या चित्रपटांची यादी मोठी आहे. यावेळी टायगरनं आणखी काही चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आवडता अभिनेता असल्याचं टायगरने यावेळी सांगितलं. अल्लू अर्जुनसारखा सर्वोत्तम डान्स करता यावा असे त्यानं म्हटलं आहे. 

थालापती विजयचा ' मास्टर ' नव्या वर्षात की दिवाळीला ?

अभिनेता टायगर श्रॉफने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी गप्पा मारल्या व त्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली. यादरम्यान एका चाहतीने टायगरला घातलेली लग्नाची मागणी सर्वांच्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman proposes marriage to Tiger Shroff his funny replay