'कुणी नसलं तरी चालेल..तुझी तू रहा..', जागतिक महिला दिनी मधुराणीची खास पोस्ट चर्चेत Women's Day 2023 Madhurani Prabhulkar post | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women's Day 2023: Madhurani Prabhulkar Post

Women's Day 2023: 'कुणी नसलं तरी चालेल..तुझी तू रहा..', जागतिक महिला दिनी मधुराणीची खास पोस्ट चर्चेत

Women's Day 2023: आज ८ मार्च..जागतिक महिला दिन...या दिनानिमित्त सोशल मीडियावर सर्वसामान्यांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांनी जागितक महिला दिना विषयी खास पोस्ट शेअर केल्या आहेत.

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिनं देखील जागतिक महिला दिनानिमित्तानं खास पोस्ट शेअर केली आहे,ज्यात तिनं आपल्या आवडत्या कवयित्रीची...तिला भावलेली कविता आपल्या खास अंदाजात बोलून दाखवली आहे.

चला जाणून घेऊया मधुराणीच्या या खास पोस्ट विषयी.(Women's Day 2023: Madhurani Prabhulkar Post)

'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे मधुराणी प्रभुलकर हे नाव आज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते. ती अनेकदा खूप सुंदर अशा वैचारिक पोस्ट शेअर करताना दिसते.

आजही तिनं जागतिक महिला दिनानिमित्तानं खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं आपल्या आवडत्या कवयित्री संजीवनी बोकील यांची कविता सादर केली आहे. 'कुणी नसलं तरी चालेल..तुझी तू रहा..'...तिनं ती कविता सादर करत त्याच्या व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे अर्थातच तिच्या चाहत्यांसाठी ही मेजवानी ठरणार.

मधुराणीनं ही कविता सादर करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील कमेंट्स करत तिनं म्हटलेली संजीवनी बोकील यांची कविता आपली देखील फेव्हरेट असल्याचं म्हटलं आहे.

सगळ्या कमेंट्समध्ये एक कमेंट मात्र थोडी विरोधात आहे. ती म्हणजे एका नेटकऱ्यानं लिहिलं होते,'हा तर एक दिवसाचा खेळ...'

असो अनेकांनी मात्र मधुराणीनं सादर केलेल्या त्या कवितेची अन् तिच्या सादरीकरणाची प्रशंसा केली आहे.