‘सायना’चा सुपर ट्रेलर रिलीज, महिला दिनाचं औचित्य 

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 8 March 2021

काही दिवसांपूर्वी सायना चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यालाही मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी प्रतिसाद दिला होता.

मुंबई - भारताची बॅटमिंटनची प्रसिध्द खेळाडू सायना नेहवालच्या आयुष्यावर एक बायोपिक येतो आहे. त्यात प्रमुख भूमिका परिणीति चोप्रानं साकारली आहे. त्या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. महिला दिनाच्या औचित्यानं हा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तो ट्रेलर पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी परिणीतिला शुभेच्छाही दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी सायना चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यालाही मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी प्रतिसाद दिला होता. आता या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. सायनानं आपल्या खेळानं सर्वांना जिंकून घेतलं होतं. त्याचप्रमाणे परिणितीचा हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल असा अंदाज प्रेक्षक व्यक्त करत आहेत. परिणितीचा हा पहिलाच बायोपिक आहे. त्यामुळे त्यातून प्रेक्षकांना अपेक्षा आहेत. काही दिवसांपूर्वी तिचा द गल्स ऑन ट्रेन नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र तो फारसा प्रभावी नसल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली आहे. त्यामुळे सायनामध्ये परिणीतीकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

सायना चित्रपटासाठी परिणीतानं खुप मेहनत घेतली आहे. तिच्या लुकसाठी, तिच्यासारख बॅटमिंटन खेळण्यासाठी कोर्टवरील वावर सहजरित्या होण्यासाठी परिणीतानं परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल अशी आशा निर्माते आणि दिग्दर्शक यांनी व्यक्त केली आहे. त्या ट्रेलरच्या बाबत सांगायचे झाल्यास त्याची सुरुवात  सायनाच्या आईच्या भूमिकेत दिसणाऱ्या मेघना मलिक यांच्या पासून होते.  लहान सायनाला बॅडमिंटन स्टार होण्याची स्वप्ने त्या दाखवत आहेत. पुढे बॅडमिंटन स्टार बनण्यासाठी सायनाचा प्रवास आणि संघर्ष सुरू होतो.

यापूर्वी एका मुलाखतीत परिणीती म्हणाली होती की, सायना नेहवालसारख्या एखाद्या व्यक्तीला पडद्यावर व्यक्त करणे हे काही सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड कष्ट घेण्याची तयारी हवी. मला हा चित्रपट करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे.

एखादा खेळाडू त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांची निर्मिती करणे हे मोठे जोखमीचे काम आहे. ते शिवधनुष्य मी यानिमित्तानं पेललं आहे. हे सांगायला आनंद होत असल्याची भावना परिणीतीनं व्यक्त केली होती.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: womens day actress parineeti chopra film saina trailer released on social media