"वंडर वूमन'चा सिक्वेल 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 जून 2017

या वर्षी प्रदर्शित झालेल्या "वंडर वूमन' या हॉलीवूडपटाचा सिक्वेल येणार आहे. या चित्रपटाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे खूश झालेली दिग्दर्शिका पॅटी जेनकिंस निर्माता जॉन बर्गसोबत सिक्वेलच्या कथेवर काम करत आहे.

जॉन बर्गने एका वेबसाईटला सांगितलं की, "पॅटी आणि मी सध्या "वंडर वूमन'च्या सिक्वेलची पटकथा लिहित आहोत. "वंडर वूमन' हा एक चांगला आणि दमदार चित्रपट बनवण्याचा आमचा उद्देश आहे.

पॅटी जेनकिंससोबत पहिल्यांदा "वंडर वूमन' चित्रपटात काम करणं खूपच भारी होतं आणि आम्ही दोघांनी आधीच या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याचा निर्णय घेतला होता.' तर दिग्दर्शिका जेनकिंसने "वंडर वूमन' प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनंतर सांगितलं की, "वंडर वूमनच्या सिक्वेलमध्ये युरोपऐवजी अमेरिकेची पार्श्‍वभूमी दाखवण्यात येणार आहे.'  

Web Title: wonder women squal