"तनू वेड्‌स मनू 3' येणार लवकरच...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

2011मध्ये अभिनेत्री कंगना राणौतचा "तनू वेड्‌स मनू' चित्रपट प्रदर्शित झाला. 2015मध्ये या चित्रपटाचा सिक्वेलही प्रेक्षकांच्या भेटीला आला. कंगनाच्या या चित्रपटाचे दोन्ही भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. प्रेक्षकांना प्रतीक्षा होती ती या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची.

अखेरीस या "तनू वेड्‌स मनू'चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. खुद्द कंगनानेच याबाबत खुलासा केला आहे. "दिग्दर्शक आनंद एल राय लवकरच "तनू वेड्‌स मनू'च्या तिसऱ्या भागाची घोषणा करतील. सध्या तरी या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू आहे', असे कंगनाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले.

कंगना सध्या "मणिकर्णिका : द क्‍वीन ऑफ झॉँसी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शिवाय तिच्या हाती आणखी दोन हिंदी चित्रपट आहेत. अशातच आता कंगना "तनू वेड्‌स मनू'च्या तिसऱ्या भागासाठीही सज्ज झालीये. एकूणच काय तर 2019 बॉलीवूड क्वीनसाठी लकी ठरणार, एवढं नक्की. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: work in progress of movie Tanu weds Manu 3