World Cancer Day : कॅन्सरला झुंज देणारे 'हे' फायटर कलाकार!

वृत्तसंस्था
Tuesday, 4 February 2020

बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध तारकांनीही कॅन्सरशी झुंज दिली आहे. त्यातील काही जणांना कॅन्सरवर मात करत आपली ताकद सिद्ध केली, तर काही जणांचे या कॅन्सरमुळे निधन झाले. अशाच काही तारेतारकांबद्दल जाणून घेऊ...

दरवर्षी 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) साजरा केला जातो. कॅन्सरबाबत जागरूकता वाढवविण्यासाठी हा एक दिवस साजरा करण्याता येतो. 1933 मध्ये स्वित्झर्लंडमधील जिनिव्हामध्ये पहिल्यांदा कॅन्स डे साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून अविरतपणे कॅन्सरच्या जनजागृती व जागरूकतेसाठी कॅन्सर डेचे आयोजन केले जाते. कॅन्सर हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा रोग आहे, ज्यामुळे माणसे मोठ्या प्रमाणात दगावतात. यामुळे जागतिक स्तरावर कॅन्सर निवारणासाठी प्रसत्न सुरू आहेत. 

आयुष्य किती क्षणभंगुर असते हे त्यामुळे कळले : विराट कोहली

बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध तारकांनीही कॅन्सरशी झुंज दिली आहे. त्यातील काही जणांना कॅन्सरवर मात करत आपली ताकद सिद्ध केली, तर काही जणांचे या कॅन्सरमुळे निधन झाले. अशाच काही तारेतारकांबद्दल जाणून घेऊ...

1. सोनाली बेंद्र 
बॉलिवूडमधलं सध्या कॅन्सरच्या झगड्यासाठी प्रसिद्ध असलेलं नाव म्हणजे अभिनेत्री सोनाली बेंद्रे. मागील वर्षी सोनालीला कॅन्सर झाला आणि तो शेवटच्या स्टेजपर्यंत पोहोचला. अशातही तिने परदेशात जाऊन कॅन्सरवरील ट्रिटमेंट घेतली. कॅन्सरशी लढा दिला. या सगळ्यात तिचा पती गोल्डी बेहेल व तिची मुलं तिच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. काही महिन्यांच्या उपचारानंतर ती बरी झाली. या सर्व काळात तिने तिचा कॅन्सर जगापासून लपवून न ठेवता सोशल मीडियाद्वारे व्यक्त झाली. कॅन्सरशी कसा लढा द्यायचा याबाबत मोटिव्हेशनल मेसेज ती देत राहिली. तिला कॅन्सर झाला हे कळताच तिचे चाहते व मित्रमंडळींनी हळहळ व्यक्त केली होती, तर तिच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थनाही केली होती.

Image result for sonali bendre cancer"

2. ऋषी कपूर
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचाही कॅन्सरशी लढा सुरूच आहे. साधारण वर्षभर ते अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये कॅन्सरवरील उपचार घेत होते. या उपचारानंतर ते बरे होऊन पुन्हा मुंबईत परतले. त्यांच्यासह त्यांची पत्नी नितू कपूर, मुलगा रणबीर कपूर, मुलगी रिदीमा व पूर्ण कपूर खानदान ऋषी यांच्या पाठिशी होतं. कॅन्सरच्या काळात त्यांनी घरचं जेवण, सणांचे सेलिब्रेशन, शूटींग हे सर्व मिस केल्याचं ते सांगतात. 

Image result for rishi kapoor cancer"

3. इरफान खान
सगळ्यांचा लाडक आणि हुशार अभिनेता इरफान खान यालाही कॅन्सरने घेरले होते. ही बातमी त्याच्या फॅन्ससाठी व त्याच्या स्वतःसाठी प्रचंड धक्कादायक होती. त्यानं सोशम मीडियावरून त्याला कॅन्सर झाल्याची बातमी दिली होती. लंडनमध्ये जाऊन त्याने कॅन्सरवरील ट्रिटमेंट घेतली. केमोथेरपीच्या सहा सायकलनंतर तो कॅन्सरपासून थोडा बरा झाला. त्यानंतर त्याने उत्साहात कम बॅक केलं व 'इंग्रजी मिडियम' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारील लागला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image result for irfan khan cancer"

4. ताहिरा कश्यप 
प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुराना याची पत्नी व दिग्दर्शिका ताहिरा कश्यप हिनेही कॅन्सरला झुंज दिली आहे. तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. तिने कॅन्सरशी लढा देत त्यावर मात दिली. ती म्हणते की, कॅन्सरमुळे मला आयुष्य जगण्याची नवी दिशा मिळाली. माझ्यात बरं होण्याची प्रचंड इच्छाशक्ती होती. इच्छाशक्ती ही कोणत्याही आजारावर मात करू शकते. या सर्व लढाईत आयुषमान पदोपदी तिच्यासह होता. तिनेही सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत चाहत्यांना धक्का दिला होता. 

Image result for tahira kashyap cancer"

5. राकेश रोशन 
ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक राकेश रोशन यांनीही त्यांच्या उतारवयात कॅन्सरशी लढा दिला आहे. मुलगा हृतिक याने त्यांना कॅन्सर झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. त्यांना घशाचा कॅन्सर झाला होता व तो प्राथमिक टप्प्यात होता. तो उपचारानंतर बरा झाला, पण तेव्हापासून त्यांनी नियमित व्यायाम करण्यास सुरवात केली. हृतिक सांगतो, की वडिल एकही दिवस जीम बुडवत नाहीत. 

Image result for rakesh roshan cancer"

6. मनिषा कोयराला
नोव्हेंबर 2012 मध्ये अभिनेत्री मनिषा कोयराला हिला कॅन्सर झाला. तिचा कॅन्सर अशा स्टेजला गेला की तिची प्रकृती प्रचंड ढासळली. तिचे केस गेले, तब्येत खराब झाली. तिने सहा महिन्याची ट्रिटमेंट घेतली. त्यानंतर कॅन्सरशी लढा देऊन ती बरी झाली व लगेचच 'संजू' या बिग बॅनर चित्रपटात तिने नर्गिस यांची भूमिका साकारली. योगायोग म्हणजे नर्गिस यांनीही कॅन्सरशी झुंज देत आपल्या जीवनाला पूर्णविराम दिला होता. 

Image result for manisha koyrala cancer"

7. अनुराग बसू 
प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बसू यांनीही कॅन्सरशी लढा दिला आहे. मोठ्या लढ्यानंतर ते कॅन्सरमधून बाहेर पडले. अनुराग सांगतात की, 'कॅन्सरशी लढा दिल्यानंतर मला आयुष्याचा खरा अर्थ सापडला. माझी खरी कलाकृती ही आजारानंतर बोहर आली. आयुष्यात या कॅन्सरने खूप काही शिकविले.'

Image result for anurag basu cancer"

8. नर्गिस दत्त
ज्येष्ठ अभिनेत्री नर्गिस दत्त यांनीही कॅन्सरशी मोठी झुंज दिली. 1980मध्ये त्यांना कॅन्सरचे निदान झाले. मुंबईतील ब्रिच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपचार घेतले. तसेच न्यूयॉर्कमध्येही त्यांनी ट्रिटमेंट घेतली. पण काही उपयोग झाला नाही. भारतात परतल्यानंतर लगेचच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून पती सुनील दत्त यांनी नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर फाऊंडेशनची स्थापना केली.  

Image result for nargis datt"


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Cancer day special Bollywood actors who successful fights with cancer