‘बघतोस काय... मुजरा कर!’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

सोनी मराठी वाहिनीवर महाराष्ट्राच्या वैभवाचं गुणगान करणाऱ्या 'गर्जा महाराष्ट्र'चे सूत्रसंचालक जितेंद्र जोशी यांच्या ‘बघतोस काय... मुजरा कर!’ या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर होणार आहे.

सोनी मराठी वाहिनीवर महाराष्ट्राच्या वैभवाचं गुणगान करणाऱ्या 'गर्जा महाराष्ट्र'चे सूत्रसंचालक जितेंद्र जोशी यांच्या ‘बघतोस काय... मुजरा कर!’ या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आणि त्यांनी बांधलेले किल्ले ही महाराष्ट्राची अभिमान स्थळं. पण महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक वैभवाकडे तरुणाईचं होणारं दुर्लक्ष जितेंद्र जोशी यांच्या या सिनेमातून अधोरेखित केलं गेललं आहे. नानासाहेब, पांडुरंग आणि शिवराज... या
खरबुजेवाडीतल्या मावळ्यांची ही कथा येत्या 14 ऑक्टोबरला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरच्या निमित्तानी सोनी मराठीवर प्रेक्षक पाहू शकणार आहेत. 'शिवरायांच्या स्मारकावर होणाऱ्या खर्चाचा निम्मा भाग जरी त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या संवर्धनावर खर्च झाला, तरी हा सिनेमा निर्माण
केल्याचं सार्थक होईल आणि महाराष्ट्राचं वैभव उजळून निघेल', असं या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात.

jitendra joshi

या सिनेमातून शिवबांचं गुणगान करणारे जितेंद्र जोशी सध्या सोनी मराठीवर सुरू असणाऱ्या 'गर्जा महाराष्ट्र' या कार्यक्रमातून महाराष्ट्राची थोर गाथा सांगत आहेत. आतापर्यंत या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या कथा सांगण्यात आल्या आहेत. तर यापुढील भागात गोपाळ गणेश आगरकर, डॉक्टर रुखमाबाई राऊत आणि महाराष्ट्र भूमीवरच्या अशाच थोर व्यक्तींच्या गोष्टी नव्यानी जाणून घेता येणार आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world television premier of baghtos kay mujra kar on sony TV