जगप्रसिद्ध रेसलर जॉन सीनाने केली बच्चन कुटुंबीयांसाठी प्रार्थना..

संतोष भिंगार्डे | Sunday, 19 July 2020

जॉनचे भारताबद्दलचे प्रेम सर्वश्रुत आहे. त्याने अनेकदा भारतात भेटी दिल्या आहेत. विशेष म्हणजे जेव्हा तो मुंबईत येतो तेव्हा त्याचे मुंबईतील अत्यंत खास आणि जवळच्या उच्च वर्गातील व्यक्तींशी भेटीगाठी होत असतात. 

मुंबई : डब्ल्यूडब्ल्यूईचे जगप्रसिद्ध रेसलर तसेच अवघ्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या जॉन सीना याने बच्चन कुटुंबियांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना केली आहे. आम्हा सर्वांच्या शुभेच्छा नेहमीच तुमच्या सोबत आहेत, असे त्याने सांगितले आहे.

अॅण्ड्रॉईड मोबाईलधारकांनो सावधान! हॅकर्सनी विकसित केला मालवेअर...

जेव्हा जॉनला कळले की अमिताभ व अभिषेक यांना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्याने सोशल मीडियावर दोघांचेही फोटो शेअर केले आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ऐश्वर्यादेखील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तेव्हा जॉनने पुन्हा ऐश्वर्या राय-बच्चन यांचे फोटो शेअर केला आहे. बच्चन कुटुंबीय लवकरात लवकर घरी परतावे याकरिता त्याने प्रार्थना केली आहे.

जॉनचे भारताबद्दलचे प्रेम सर्वश्रुत आहे. त्याने अनेकदा भारतात भेटी दिल्या आहेत. विशेष म्हणजे जेव्हा तो मुंबईत येतो तेव्हा त्याचे मुंबईतील अत्यंत खास आणि जवळच्या उच्च वर्गातील व्यक्तींशी भेटीगाठी होत असतात. 
---
संपादन : ऋषिराज तायडे