'त्या' अपघातामुळे यामीचं IAS अधिकारी बनण्याचं स्वप्न राहिलं अपूर्ण

yami gautam
yami gautam

'विकी डोनर', 'उरी', 'बाला' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री यामी गौतमला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं नव्हतं. यामीला आयएएस (IAS) अधिकारी व्हायचं होतं. मात्र एका अपघातामुळे तिचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. २०२० मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत यामी या अपघाताविषयी व्यक्त झाली होती. 
 
कॉलेजमध्ये असताना यामीचा अपघात झाला होता आणि या अपघातात तिच्या मानेला दुखापत झाली होती. यामी दुचाकीवर असताना एका कारने तिला धडक दिली होती. "मी त्यावेळी चंदीगडमधल्या विद्यापिठात जात होते. दुचाकीवर जात असताना चुकीच्या दिशेने जाणाऱ्या कारने मला धडक दिली. सुदैवाने मी हेल्मेट घातलं होतं, त्यामुळे माझ्या डोक्याला काही दुखापत झाली नव्हती. पण मी इतक्या जोरात खाली पडले होते, की उठून उभीसुद्धा राहू शकत नव्हते. मला बाहेर कुठे फार लागलं नाही. पण मानेला जबर धक्का बसला होता. मानेत फ्रॅक्चर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मी कधीच वर्कआऊट करू शकणार नाही, असं डॉक्टर म्हणाले. मला त्यावेळी आयएएस अधिकारी बनायचं होतं", असं तिने 'बॉम्बे टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

लॉकडाउनदरम्यान नियमित योगसाधना केल्याचा खूप फायदा झाल्याचंही तिने सांगितलं. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये तिने चाहत्यांना विनंती केली होती की, 'एखादा व्यक्ती कसा आहे हे त्याच्या दिसण्यावरून ठरवू नका. तो व्यक्ती बाहेरुन तुम्हाला फिट दिसत असेल, पण त्याचा संघर्ष त्यालाच माहित असेल.' यामी २०२० मध्ये 'गिन्नी वेड्स सनी' या चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. 'भूत पोलीस' आणि 'दसवी' या आगामी चित्रपटांमध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com