'उरि'साठी यामीचा नवीन लूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

यामी गौतमने आजपर्यंत तिच्या प्रत्येक भूमिकेसाठी तितकीच मेहनत घेतली आहे. मग ती ‘काबील’मधील भूमिका असो वा ‘विकी डोनर’मधली. याही वेळी यामीने आपल्या नवीन भूमिकेसाठी छोटीशी गोष्टही सोडलेली नाही. यामी आता आदित्य धर दिग्दर्शित ‘उरि’ या चित्रपटात दिसणार आहे.

2016 मध्ये झालेल्या उरि हल्ल्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी यामीने आपला लूक बदललेला आहे. नुकताच यामीने इन्स्टाग्रामवर तिच्या या नव्या लूकचा फोटो शेअर केला. तिने ‘उरि’मधील आपल्या भूमिकेसाठी बॉब कट केला आहे. या लूकमध्ये नक्कीच यामी क्‍लासी दिसत आहे. तिने हेअरस्टाईलिस्ट आणि दिग्दर्शक आदित्य यांनी मिळून यामीचा हा नवा लूक ठरवला आहे. या लूकबद्दल यामी म्हणते, ‘‘जेव्हा आदित्याने माझ्याबरोबर माझी भूमिका डिस्कस केली तेव्हा या भूमिकेला अधिक रिॲलिस्टिक बनवण्यासाठी मी कोणतीच कसर सोडू इच्छित नव्हते. आम्ही काही ट्रायल्स केले आणि मगच पुढे गेलो. मला माझा लूक खूपच आवडलाय. आशा आहे की प्रेक्षकांनाही आवडेल.’’
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yami gautam s new look for upcoming film uri