यामी झळकतीय टिकटॉकवर; व्हिडिओ बघाच!

yami gautam s tiktok video gets viral
yami gautam s tiktok video gets viral

सध्या सगळीकडे चर्चा असलेला चित्रपट म्हणजे आयुषमानचा 'बाला'... आयुषमानचा कोणताही चित्रपट असो तो हीट होतोच... त्याचा अभिनय, त्याचं दिसणं यावर मुली फिदा आहेत. मात्र बाला आणखी एका कारणामुळे चर्चेत आला, ते म्हणजे  यामी गौतममुळे! यामीने बालामध्ये टिकटॉक स्टारची भूमिका केली आहे. यावरून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक मजेदार कसबही कळालं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thank you for making PARI tick-tock her way through your hearts Thank you for this love @indiatiktok

A post shared by Yami Gautam (@yamigautam) on

यामीचं इन्स्टाग्राम अकाऊंट हे खूप फेमस आहे आणि त्याहूनही जास्त त्यावरचे टिकटॉक व्हिडिओ व्हायरल होतात. आधी वाटलं होतं की बालामुळेच ती टीकटॉक व्हिडिओ करते. पण नाही.... तिला स्वतःला टिकटॉकवर व्हिडिओ करायला खूप आवडतं. बालामध्ये तिने ज्या टीकटॉक स्टारची भूमिका केली आहे, तिचं नाव परी आहे. मात्र, यामी खऱ्या आयुष्यातही टीकटॉक स्टार आहे. 

खरंतर तिने बालासाठीच टीकटॉक वापरायला सुरवात केली. तिच्या एका मित्राने तिला टिकटॉक संदर्भात मार्गदर्शन केले. टिकटॉकवर वारंवर व्हिडिओ करणे तिला चित्रपटासाठी उपयोगी ठरलं. टिकटॉकच्या लोकप्रियतेचा उपयोग तिने आपल्या अभिनयातही केला आहे. टिकटॉक हे तिच्या आयुष्यातलं खूप महत्त्वाचं अॅप आहे, जे तिला खूप मोलाची मदत करत आहे, असं तिने एका कार्यक्रमात सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com