यामीचा "उरि' येतोय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

यामी आदित्य धर यांच्या "उरि' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट सप्टेंबर 2016 मध्ये उरी येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित आहे.

"काबील' चित्रपटानंतर काही दिवस गायब झालेली यामी गौतम लवकरच शाहिद कपूरच्या "बत्ती गुल मीटर चालू' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती वकिलाची भूमिका करणार आहे.

yami

त्यापाठोपाठ ती आदित्य धर यांच्या "उरि' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट सप्टेंबर 2016 मध्ये उरी येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित आहे. त्यात विकी कौशल तिचा सहकलाकार असेल. ते दोघेही गुप्तहेराच्या भूमिकेत दिसतील. या भूमिकेच्या तयारीसाठी यामीने मिक्‍स मार्शल आर्टचे धडे गिरवण्यास सुरुवात केली आहे. यामी फिटनेसच्या बाबतीत तशी जागरूक आहेच. मिक्‍स मार्शल आर्टचे प्रशिक्षण तिला फिटनेस राखण्यासाठीही उपयोगी पडेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yami gautam in uri movie