Bigg Boss Marathi 4: आपलं मत तिथे दाबलं जातं.. यशश्रीचा रोख कुणाकडे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yashashri gossiping with rohit shinde and samruddhi on other group Bigg Boss Marathi 4

Bigg Boss Marathi 4: आपलं मत तिथे दाबलं जातं.. यशश्रीचा रोख कुणाकडे?

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल रुचिरा जाधवला बाहेर पडावे लागले. आज यशश्री, रोहित आणि समृद्धी चर्चा करताना दिसणार आहे. ज्यामध्ये यशश्री रुचिराबद्दल काही गोष्टी सांगणार आहे. आणि काही सदस्यांबद्दल समृद्धी आणि यशश्री आपले मत मांडताना दिसणार आहेत.

(yashashri gossiping with rohit shinde and samruddhi on other group Bigg Boss Marathi 4)

हेही वाचा: Prarthana Behere: नवऱ्यासोबतचा रोमॅंटिक व्हिडिओ शेयर करत प्रार्थना म्हणाली..

यशश्री म्हणते, "खूप मोठ्याने बोलणारे, आपले म्हणणं मांडणारे आणि ते पटवून देणारी लोकं इथे आहेत. काहीही झालं तरी ते आपलंच खरं करणार. त्यांच्या तुलनेत मला रुचिरा अशी वाटते की, तिला जरी कळलं ना समोरच्याचं काय चाललं आहे काय नाही तरी तिला लोकांची मनं दुखवायला आवडत नाही.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: दो हंसो का जोडा बिछड गयो रे.. रुचिरा जाधव घराबाहेर !

त्यावर समृद्धीचे म्हणते, 'हेच कारण आहे मी आणि यशश्री माझ्या नॉमिनेशननंतर जे बोलायला आलो होतो. जे आपण ठरवलं होतं तिसरा ग्रुप तयार करायचा… मला पण कुठे ना कुठे असंच वाटतं होतं की, हे तर माझ मत होतं पण... फक्त ते बोले म्हणून ते त्यांचे मत म्हणून बाहेर जात आहे. वेळ आल्यावर आपण ती गोष्ट केली असती ना तर आज हि वेळ नसती आली.'

त्यावर यशश्रीचे म्हणणे आहे, 'काय असतं ना रोहित आपला आवाज असला, आपलं मत असलं तरी देखील ते दाबलं जातं आणि ज्याप्रकारे हे लोकं इतरांसमोर मांडतात, किंवा मनावर बिंबवतात ना त्याचा हा परिणाम आहे.' आता ही नेमकं कुणविषयी बोलत आहे स्पष्ट झालेलं नसलं तरी दोन्ही ग्रुप विषयी हे आहे. म्हणजेच इतर दोन ग्रुप मध्ये कशाप्रकारे आवाज केला जातो त्यावर यशश्री बोलली आहे. पण आता स्वतःचा आवाज मांडण्यासाठ या तिघांची युती झाल्याचे दिसत आहे. लवकरच या घरात 'ए' आणि 'बी' विरोधात लढणारी 'सी' टीम तयार होणार हे नक्की.

टॅग्स :Big Bossbigg boss marathi