'50 रुपये द्या, यशराजच्या बॅनरचे सुपरहिट चित्रपट पाहा'  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yashraj banner announced 50 rupees offer to viewers

पीव्हीआर (PVR) सिनेमा, आयनॉक्स (INOX) आणि सिनेपोलिस (CINEPOLIS) एकत्र येत आहेत.50 वर्षे पूर्ण झाल्यामुळे यशराजने देशातील बड्या सिनेमा हॉल्सना त्यांचे सदाबहार आणि सुपरहिट सिनेमे विनामूल्य प्ले करण्याची परवानगी दिली आहे.

'50 रुपये द्या, यशराजच्या बॅनरचे सुपरहिट चित्रपट पाहा' 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  बॉलीवूडमध्ये  प्रसिध्द असणा-या यशराज बॅनरने आपल्या चाहत्य़ांसाठी एक आगळी वेगळी आनंदाची मोठी पर्वणी दिली आहे. यशराजच्या बॅनरचे अनेक चित्रपटांची आठवण रसिकांनी आपल्या ह्रद्यात जपून ठेवली आहे. आता त्यांनी दिवाळीचा मुहूर्त साधून चाहत्यांसाठी एक खास योजना आखली आहे.

यशराज फिल्मचं हे अनोखं गिफ्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून थिएटर बंद असल्याने निर्माते, दिग्दर्शक यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या. आता चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी शासनाकडून परवानगी देण्यात आली असली तरी त्याला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळणार याबाबत शंका आहे. प्रेक्षकांची पावले थिएटरकडे वळावीत यासाठी आता यशराजने पुढाकार घेतला आहे.

यशराज फिल्मने प्रॉडक्शनने 50 वर्ष पूर्ण केली आहे आहेत. त्यानिमित्ताने 3 मोठ्या मल्टिप्लेक्स चेन पीव्हीआर (PVR) सिनेमा, आयनॉक्स (INOX) आणि सिनेपोलिस (CINEPOLIS) एकत्र येत आहेत.50 वर्षे पूर्ण झाल्यामुळे यशराजने देशातील बड्या सिनेमा हॉल्सना त्यांचे सदाबहार आणि सुपरहिट सिनेमे विनामूल्य प्ले करण्याची परवानगी दिली आहे. हे चित्रपट केवळ 50 रुपयांच्या तिकिटावर पाहता येणार आहेत.
यात यशराज  सिलसिला, बंटी और बबली, रब ने बना दी जोडी, एक था टायगर, जब तक है जान, बँड बाजा बारात, दम लगा के हैशा, सुलतान, मर्दानी, वीर जारा आणि दिल तो पागल है या चित्रपटांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे.

लोकांना हे चित्रपट पाहण्यासाठी फक्त 50 रुपये मोजावे लागणार आहेत. कोरोनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागला आहे. चित्रपटगृहे, थिएटर, मल्टिप्लेक्स 7 महिने पासून बंद होते आणि त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीचे 3500 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. 15 ऑक्टोबरपासून थिएटर्स उघडण्याची परवानगी सरकारने दिली आहे, मात्र प्रेक्षकांची पावले ही थिएटरकडे वळली नसल्याने थिएटर मालकांची डोकेदुखी वाढली आहे. 
 

loading image
go to top