Krishna Mukherjee: 'ये है मोहब्बतें' फेम कृष्णा मुखर्जीने गोव्याच्या समुद्रकिनारी केलं लग्न, समोर आले सुंदर फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

krishna mukherjee and chirag batliwala

Krishna Mukherjee: 'ये है मोहब्बतें' फेम कृष्णा मुखर्जीने गोव्याच्या समुद्रकिनारी केलं लग्न, समोर आले सुंदर फोटो

स्टार प्लसची प्रसिद्ध मालिका 'ये है मोहब्बतें' मधून घराघरात नावाजलेली कृष्णा मुखर्जीने अखेर तिचा प्रियकर चिराग बाटलीवालासोबत लग्नगाठ बांधली आहे. गोव्यात बंगाली रीतिरिवाजांनी दोघांनी लग्न केले आहे.

या जोडप्याने त्यांचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांमध्ये सात फेरे घेतले. दरम्यान, आता कृष्णा मुखर्जी आणि चिराग यांच्या लग्नाचे पहिले फोटोही समोर आले आहेत, ज्यामध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत.

अभिनेत्री कृष्णा मुखर्जी तिच्या लग्नामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. तिचे चाहते लवकरात लवकर लग्नाची वाट पाहत होते. काल म्हणजेच १३ मार्चला कृष्णाने अखेर गोव्यात चिराग बाटलीवालाशी लग्न केले. या जोडप्याने कुटुंब आणि मित्रांसोबत बीचवर लग्न केले.

बंगाली रितीरिवाजानुसार लग्नासाठी हे जोडपे लाल आणि पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसले. कृष्णाने मुकुटसह पांढरा आणि लाल रंगाचा लेहेंगा घातला होता, तर चिरागने टोपोर घातला होता. सुपारीच्या पानाने चेहरा झाकून कृष्णाने मंडपात प्रवेश केला.

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही पारंपारिक बंगाली कपड्यांमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. फोटो शेअर करत कृष्णाने लिहिले की, "आणि एका बंगाली मुलीने पारशी मुलासोबत आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली आहे. या खास दिवशी आम्हाला तुमचे प्रेम आणि आशीर्वाद हवे आहेत."

गोव्यात कृष्णा आणि चिरागच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यामध्ये जस्मिन भसीन, अली गोनी, शिरीन मिर्झा, चारू मेहरा, अरिजित तनेजा, करण पटेल आणि इतर अनेक स्टार्स मस्ती करताना दिसले.

या सेलिब्रिटींनी लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत. लग्नापूर्वी सर्वांनी लग्नाआधीच्या सर्व फंक्शन्समध्ये खूप धमाल केली होती, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. कृष्णा आणि चिरागची गेल्या वर्षी एंगेजमेंट झाली होती.