Honey Singh: घटस्फोट होताच हनी सिंगला मिळालं नवी गर्लफ्रेंड! व्हिडिओ व्हायरल... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Honey Singh

Honey Singh: घटस्फोट होताच हनी सिंगला मिळालं नवी गर्लफ्रेंड! व्हिडिओ व्हायरल...

प्रसिद्ध रॅपर, संगीतकार आणि संगीत निर्माता यो यो हनी सिंग हा सध्या त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत आहे. त्यातच त्याच नवीन गाणं ही चांगलच गाजत असतांना त्याची लव्ह लाईफ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

हेही वाचा: Bigg Boss 4: "अंघोळ घालते राखी सावंत..." राखीला प्रसाद म्हणाला...

घटस्फोटानंतर त्याचं नाव टीना थडानीसोबत जोडलं गेलं. मात्र त्यावेळी दोघांनीही याबाबत काही पुष्टी केली नव्हती. मात्र आता एक व्हिडिओसमोर आलाय त्यात ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.

हनी सिंगने यापूर्वी स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये तो एका मुलीचा हात धरताना दिसत होता. फोटोत मुलीचा चेहरा दिसत नसला तरी फोटो पाहून असे वाटले की हनी सिंग कुणाला तरी डेट करत आहे.

टीना आणि हनी सिंग दोघ एकत्र दिसत आहेत. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.यो यो हनी सिंग 6 डिसेंबरला नवी दिल्लीत टीना थडानीसोबत दिसला. दोघेही एका कार्यक्रमासाठी येथे आले होते आणि त्यांनी काळ्या रंगाचे कपडे घातले होते. हनीने टीनाचा हात धरला होता. त्यांच्या आजूबाजूला अंगरक्षक आणि पापाराझी दिसत होते.

हनी सिंग आणि टीनाचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. एकाने कमेंट केली, "त्यामुळेच तर घटस्फोट झाला, हिची ओळख करून द्यायची होती ना." एकाने लिहिलंय, "हे बॉलीवूडच्या लोकांना काही काम नाही का? लग्न करा घटस्फोट घ्या आणि पुन्हा नवीन मैत्रीण बनवा" एका पठ्ठ्यानं तर असं म्हटलंय, "तो तिला पुन्हा शिवीगाळ करेल का?"

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

टीना थडानी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती सध्या रॅपर हनी सिंगला डेट करत आहे. ती कॅनडियन मॉडेल आहे. 'द लेफ्टओव्हर्स' या शॉर्ट फिल्मची दिग्दर्शकही आहे. ती सध्या मुंबईत राहत असून हनी सिंगसोबत वारंवार स्पॉट होत आहे. ती पहिल्यांदा पॅरिस का ट्रिप' गाण्यात हनी सिंगसोबत दिसली होती. हे गाणंही सुपरहिट ठरले.