यो यो हनी सिंगचा शो बंद पाडला, जीवे मारण्याची दिली धमकी

साऊथ दिल्लीमध्ये एका क्लबमध्ये बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक यो योय हनी सिंगचा शो आयोजित करण्यात आला होता.
yo yo honey singh
yo yo honey singhteam esakal

Entertainment News: साऊथ दिल्लीमध्ये एका क्लबमध्ये बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक यो योय हनी सिंगचा शो आयोजित करण्यात आला होता. मात्र (Yo Yo Honey Singh) त्याच्यासोबत काही जणांनी गैरवर्तन केल्यानं तो शो रद्द करण्यात आला आहे. दरम्यान त्या शोमध्ये जबरदस्तीनं पाच ते सहा व्यक्ती घुसल्या. आणि (Bollywood News) त्यांनी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली होती. एवढेच नाहीतर हनी सिंगला स्टेजवर जावून धमक्याही त्यांनी दिल्या होत्या. शो सुरु (Bollywood Ent latest News) असताना बियरच्या बाटल्या प्रेक्षकांना दाखवल्या. हे सगळं पाहिल्यावर हनी सिंगनं आपल्याला हा शो रद्द करावा लागत असल्याचे सांगून घटनास्थळावरून घरी परतावे लागले होते.

सध्या सोशल मीडियावर हनी सिंग आणि साऊथ दिल्ली मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शो ची मोठ्या प्रमाणवर चर्चा सुरु आहे. या प्रकरणाची दिल्ली पोलिसांनी दखल घेऊन संबंधितांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. मात्र एफआयआरमध्ये कोणत्याही आरोपीचे नाव नमुद करण्यात आलेले नाही. पोलीस पीडित, सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्यक्षदर्शींच्या आधारे अनेकांची तपासणी करत आहे. ही घटना 26 मार्च रोजी रात्री साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनी सिंगच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्यक्ष घट़नास्थळी हनी सिंगच्या नावानं प्रसिद्ध असणाऱ्या हिरदेश सिंगच्या गाण्याचा कार्यक्रम सुरु होता. त्याचवेळी अचानक पाच ते सहा जण जबरदस्तीनं स्टेजवर आले आणि त्यांनी कार्यक्रमामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

yo yo honey singh
Viral News: मिकाच्या जिव्हारी लागला तो प्रश्न, पत्रकाराला केली शिवीगाळ

आरोपींनी यावेळी प्रेक्षकांना दारुच्या बाटल्या दाखवत हनी सिंगला धमक्याही दिल्या. प्रेक्षकांनी त्या व्यक्तींना समजावण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र ते काही ऐकण्याच्या मनस्थितीतही नव्हते. त्यांच्याकडे हत्यारेही होती असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. या प्रकरणाची दिल्ली पोलिसांनी दखल घेतली असून त्याचा तपास सुरु केला आहे. काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यातही घेतल्याचे समजते. त्या व्यक्ती कोण होत्या. त्यांचा धांगडधिंगा घालण्यामागे काय उद्देश होता, याचा पोलीस तपास करत आहे.

yo yo honey singh
Salman Ex Girlfriend: ऐश्वर्यासारखे त्या अभिनेत्रींकडूनही सत्य बाहेर येईलच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com