भन्नाट मैत्रीचा 'यंग्राड' सिनेमा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

वयात आलेल्या चार उनाड मुलांची मैत्री सिनेमात दाखवली आहे. शिवाय राजकारणी त्यांच्या फायद्यासाठी कसे तरुण मुलांचा वापर करुन घेतात, अशी काहीशी ही कथा आहे.

पुणे - 'यंग्राड' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच 'यंग्राड' सिनेमाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे. उनाड मुलं ते आयुष्याची गणितं सोडविण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अशी ही सिनेमाची कहानी पुढे सरकत जाते. सिनेमाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते मकरंद माने यांनी केले आहे. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेता शशांक शेंडे यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. 

विठ्ठल पाटील, गौतम गुप्ता, गौरव गुप्ता आणि मधु मंटेना यांनी संयुक्तरित्या सिनेमाची निर्मिती केली आहे. वयात आलेल्या चार उनाड मुलांची मैत्री सिनेमात दाखवली आहे. शिवाय राजकारणी त्यांच्या फायद्यासाठी कसे तरुण मुलांचा वापर करुन घेतात, अशी काहीशी ही कथा आहे. यातून हे चार मित्र स्वतःला कसे सांभाळतात अशी कथा पुढे सरकते. 

'यंग्राड'चे लेखन मकरंद माने यांनी केले असून त्यांनी सिनेमाची पटकथा शशांक शेंडे आणि अझीझ मदारी यांच्यासह लिहिली आहे. युवा संगीत दिग्दर्शक ह्रद्य गट्टानी आणि गंगाधर यांनी संगीत दिले आहे. सिनेमाची गाणी क्षितीज पटवर्धन, दत्ता पाटील आणि माघलुब पूनावाला यांनी लिहीली आहेत. यातील चार गाणी शंकर महादेवन, दिव्य कुमार, शाश तिरुपती आणि ह्रद्य गट्टानी यांनी गायली आहे. 

सिनेमात मुख्य चार मित्र म्हणजे चैतन्य देवरे, सौरभ पाडवी, शिव वाघ आणि जीवन करळकर यांच्याभोवती ही कथा फिरते. शिरीन पाटील ही मुख्य नायिकेच्या भुमिकेत आहे. शिवाय शरद केळकर, सविता प्रभुणे, विठ्ठल पाटील, शंतनू गणगणे या कलाकारांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. 'यंग्राड' येत्या 6 जुलैला प्रदर्शित होणार आहे. 

'यंग्राड' टीमच्या 'ई सकाळ'शी गप्पा...

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youngraad Marathi Movie Coming Soon