हिंदी देखील सहजरित्या न बोलणारी सनी लिओनी घेतेय मराठीचे धडे.. सनीच्या तोंडून मराठी ऐकायचंय तर हा व्हिडिओ पहाच..

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

प्रसिद्ध युट्युबर निक जो सहसा 'बी युनिक' या नावाने ओळखला जातो, त्याच्यासोबत इन्स्टाग्रामवर 'लॉक्डअप विथ सनी' या चॅट शोमध्ये सनी लिओनी संवाद साधत होती आणि संवाद साधत असताना निकने सनीला मराठी भाषा शिकवली आहे.

मुंबई- देशभरात लॉकडाऊन असताना सगळेच कलाकार आपापल्या घरी आहेत. या लॉकडाऊनचा सर्व कलाकारांना फायदाच झाला आहे. कारण प्रत्येक जण या लॉकडाऊनमध्ये काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणी पाककला शिकतंय, कोणी नवीन वाद्य वाजवायला शिकतंय तर कोणी चित्रकला शिकतंय... अशा प्रकारे सगळ्याच कलाकारांचे हिडन टॅलेंट बाहेर येताना दिसत आहे. अशातच अभिनेत्री सनी लिओनी प्रसिद्ध युट्युबर निककडून मराठी भाषेचे धडे घेत आहे. सनीने या लॉकडाऊनदरम्यान तिचा स्वतःचा इन्स्टाग्राम चॅट शो लॉन्च केला आहे. 'लॉक्डअप विथ सनी' असे या चॅट शोचे नाव आहे. या चॅट शोमधून ती तिच्या फॅन्स आणि फॉलोवर्सचे मनोरंजन करते. ती या चॅट शोमधून वेगवेगळ्या कलाकारांसोबत इन्स्टाग्रामवर लाईव्ह जाते आणि त्याच्यासोबत संवाद साधते. नुकतीच ती प्रसिद्ध युट्युबर निक जो सहसा 'बी युनिक' या नावाने ओळखला जातो, त्याच्यासोबत इन्स्टाग्राम 'लॉक्डअप विथ सनी' या चॅट शोमध्ये संवाद साधत होती आणि संवाद साधत असताना निकने सनीला मराठी भाषा शिकवली आहे.

हे ही वाचा: दिग्दर्शक रवी जाधवच्या मुलाला जीवदान.. १६ व्या वाढदिवशी मिळालं अनोखं सरप्राईज

निकने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये निक सनीला काही मराठी संवाद शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने सनीला 'मी तुझ्यावर प्रेम करते, आणि मला तुझ्याशी लग्न करायचे आहे'  हे मराठी संवाद विनोदी अंदाजात शिकवले आहेत. यावर सनीनेही ते अगदी बरोबर बोलूनही दाखवले आहे. अर्थात सनीला मराठी भाषा कळतं नसल्याने तिला असं वाटलं की निक तिला तिच्या फॅन्सला आय लव्ह यू म्हणायला सांगतो आहे.

YouTuber Be YouNick Teaches Sunny Leone Marathi On Her Chat Show ...

याशिवाय निकने सनीला त्याचा प्रसिद्ध डायलॉग 'रिपब्लिक ऑफ डोंबिवली' हेही बोलायला शिकवले. या संपूर्ण व्हिडिओमधून दोघांनीही चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले. याशिवाय या लाईव्ह चॅटमध्ये निकने सनीसाठी गिटार वाजवून 'बेबी डॉल' हे गाणं देखील गायले आहे. या गाण्याने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Teaching Marathi to @sunnyleone ... Tag your Maharashtrian Friends #lockedupwithsunnyleone

A post shared by Nick (@beyounick) on

सनीने 'लॉक्डअप विथ सनी' हा चॅट शो लॉकडाऊन दरम्यान सुरू केला आहे. आणि या चॅट शोमधून चाहत्यांचे मनोरंजन करणे हाच या शोचा मुख्य उद्देश आहे. या चॅट शोद्वारे सनी रोज एखाद्या सेलिब्रेटीसोबत लाईव्ह चॅट करते आणि वेगवेगळ्या नवीन गोष्टी शिकत असते.

youtuber be younick teaches sunny leone marathi on her chat show locked up with sunny  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youtuber be younick teaches sunny leone marathi on her chat show locked up with sunny