ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर प्रसिद्ध युट्यूबरचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

lilly singh
lilly singh

प्रसिद्ध युट्यूबर आणि कंटेट क्रिएटर लिली सिंहने ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात प्रवेश करताच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. लिलीने ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यातील रेड कार्पेटवर 'I Stand With Farmers' (माझा शेतकऱ्यांना पाठिंबा) असा संदेश लिहिलेला मास्क लावून प्रवेश केला. नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या वेशींवर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची चर्चा जगभरात होत आहे. आता लिलीने प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर शेतकऱ्यांची बाजू घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. लिलीने याचा फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला. लिली ही कॅनेडियन युट्यूबर असून जगभरात तिचे फॉलोअर्स आहेत.  

लिलीने तिचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत लिहिलं, 'मला माहितीये की रेड कार्पेटवरील फोटोंची सर्वांत जास्त चर्चा होते. तर मग हे घ्या मीडिया. या फोटोचा वापर करण्यासाठी तुम्हाला पूर्ण परवानगी आहे.' या फोटोमध्ये लिलीने शेतकऱ्यांना पाठिंबा देणारा मास्क घातलेला पाहायला मिळतोय. लिलीच्या या फोटोला तीन तासांत ९० हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. या लाइक्समध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. अभिनेत्री दिया मिर्झानेही लिलीच्या या फोटोला लाइक केलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lilly Singh (@lilly)

इंडियन-कॅनेडियन युट्यूबर लिली सिंहचे इन्स्टाग्रामवर ९ दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर तिच्या युट्यूब चॅनलला १४ दशलक्षांहून अधिक लोकांनी सबस्क्राइब केलंय. दिल्लीच्या सीमारेषांवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. डिसेंबर महिन्यापासून हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमारेषांवर तंबू ठोकून आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी विषयक कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने हे कायदे रद्द करावेत आणि नंतर चर्चा करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या आंदोलनाबाबत याआधी आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉप गायिका रेहाना हिनेसुद्धा ट्विट केलं होतं. तिच्या पाठोपाठ पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि इतर काही सेलिब्रिटींनीही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com