अश्लील कमेंट करणं भोवलं, प्रसिद्ध युट्युबरला अटक

आठ लाख सबस्क्रायबरला त्या ऑनलाईन प्रतिबंधित गेम्स वर अॅड करतो आणि त्यांच्या माध्यमातून पैसे कमवतो.
madan kumar arrest
madan kumar arrest Team esakal

मुंबई - प्रसिध्द युट्युबर आणि पबजी प्लेयर मदन कुमारला (popular youtuber madan kumar) पोलिसांनी अटक केली आहे. त्यानं ऑनलाईन चॅनेल आणि गेम पोर्टलवर महिलांच्या विरोधात अश्लील कमेंट केली. ती व्हायरल झाल्यानं पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. मदन हा एक लोकप्रिय युट्युबर आणि पबजी प्लेयर आहे. त्याला फॉलो करणा-यांची संख्याही मोठी आहे. मदन कुमारला धर्मपुरी सिटी पोलिसच्या सायबर क्राईम विंगनं (cyber crime) अटक केली आहे. (youtuber madan kumar arrested in tamil nadu for accused of obscene content online)

काही दिवसांपूर्वी मदनची पत्नीलाही सेलममधून (celam) पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी सांगितलं, मदनच्या विरोधात एकानं तक्रार केली. त्यानं सोशल मीडियावर महिलांबाबत अश्लील कमेंट केली. याशिवाय त्यानं आपल्या युट्युब चॅनेलवर प्रतिबंधित पबजी ऑनलाईन गेम्स दाखवल्यानं त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मदनचे आठ लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. त्यावरुन त्याची लोकप्रियता लक्षात येते.

आपल्या आठ लाख सबस्क्रायबरला त्या ऑनलाईन प्रतिबंधित गेम्स वर अॅड करतो आणि त्यांच्या माध्यमातून पैसे कमवतो. याशिवाय काही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओही अपलोड करत असतो. पोलिसांनी त्याच्या घरातून एक लॅपटॉप, टॅबलेट आणि मोबाईल यांच्या सहित आणखी काही वस्तू जप्त केल्या आहेत. मुळ सेलमचा असणारा मदन युवा वर्गात विशेष लोकप्रिय आहे. त्यान ऑनलाईनच्या माध्यमातून प्रचंड पैसा कमवला आहे. त्याच्याकडून दोन लक्झरी कारही जप्त करण्यात आल्या आहेत.

madan kumar arrest
अंडरटेकर सिरियस झाला, बॉलीवूडच्या खिलाडीची तंतरली...

जी मुले मोठ्या प्रमाणात पब्जी खेळतात त्यांच्यामध्ये मदनची क्रेझ आहे. लाईव्ह व्हिडिओ गेम्स स्ट्रीमिंग करणं, त्यात तरुणांना सहभागी करुन घेणं, यासाठी तो ओळखला जातो.यासारख्या व्यक्तिंच्या आहारी जावून वाईट संगतीला न जाण्याचे आवाहन पोलिसांनी तरुणांना केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com